You are currently viewing मराठी पत्रकार परिषदेचा विरार येथे १५ मे रोजी पुरस्कार वितरण सोहळा

मराठी पत्रकार परिषदेचा विरार येथे १५ मे रोजी पुरस्कार वितरण सोहळा

पंढरीनाथ सावंत यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करणार

 

खरे, कैतके, नानिवडेकर, प्रभावळकर, काळे,दगडू, रांजवणकर, पाटील या जेष्ठ पञकाराचा होणार गौरव

 

सावंतवाडी / प्रतिनिधी :

मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणारया विविध पुरस्कारांचे वितरण १५ मे रोजी वसई तालुक्यातील विरार येथे होत असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे..ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना या समारंभात बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.. २५ हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी राज्यातील मान्यवर पत्रकारांना विविध पुरस्काराने सन्मानित केले जाते.. मात्र कोरोना काळात पुरस्कार वितरण झाले नव्हते. त्यामुळे २०२१ चे पुरस्कार १५ मे रोजी दिले जाणार आहेत. मार्मीक चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांच्याबरोबरच झी 24 तास या वृत्तवाहीणीचे संपादक निलेश खरे यांना आचार्य अत्रे पुरस्कार , मृणालिनी नानिवडेकर, दीपक प्रभावळकर, राजेंद्र काळे, रावसाहेब गोगटे पुरस्कार भारत रांजणकर (अलिबागला), अच्युत पाटील, गाववालाचे संपादक उत्तम दगडू, स्व.शशिकांत सांडभोर स्मृती पुरस्कार आरोग्य श्रेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी) दिपक कैतके याना देण्यात येणार आहे. या पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.

विरार येथे विवा काॅलेज, सेमिनार हाॅल, चौथा मजला, विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, जुना विवा काॅलेज मार्ग, विरार (पश्चिम) येथेहा पुरस्कार वितरण सोहळा पार पडत आहे.. या कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन, राज्य महिला संघटक जान्हवी पाटील आदिंनी केले आहे.

पुरस्कार प्राप्त पत्रकार

1) बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार

पंढरीनाथ सावंत (मुंबई)

2) आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार

निलेश खरे (मुंबई)

3) रावसाहेब गोगटे स्मृती पुरस्कार

अच्युतराव पाटील ( पालघर)

4) नोगोरावजी दुधगावकर स्मृती पुरस्कार

उत्तम दगडू (वसमतनगर)

5) शशिकांत सांडभोर सामाजिक सेवा पुरस्कार

दीपक कैतके ( मुंबई)

6) प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार

दीपक प्रभावळकर (सातारा)

7) सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार

मृणालिनी नानिवडेकर (मुंबई)

8) भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार

राजेंद्र काळे (बुलढाणा)

9) दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार

भारत रांजणकर (अलिबाग) यांना प्रदान करण्यात येणार आहे तरी मोठ्या संख्येने पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 12 =