You are currently viewing गाबीत महोत्सवात ‘सागरी सुंदरी’ स्पर्धेचे आयोजन

गाबीत महोत्सवात ‘सागरी सुंदरी’ स्पर्धेचे आयोजन

मालवण

अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ व सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाज यांच्या वतीने मालवण दांडी किनाऱ्यावर होणाऱ्या गाबीत महोत्सवात दि. २८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता सागरी सुंदरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत गाबीत समाजातील १८ ते ३५ वयोगटातील विवाहित आणि अविवाहित महिला सहभागी होऊ शकतात.

ही स्पर्धा पारंपरिक वेशभूषा फेरी, पाश्चिमात्य वेशभूषा फेरी, मनपसंत फेरी अशा तीन फेऱ्यांमध्ये होणार आहे. या फेऱ्यांदरम्यान आवडीचे गाणे, डान्स, स्किट सादर करणे तसेच प्रश्नमंजुषा यांचाही समावेश असणार आहे. स्पर्धेत २० स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये प्रथम पारितोषिक रोख १०,०००/- रु., मुकुट, चषक आणि प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक रोख ७,०००/- रु., मुकुट, चषक आणि प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक रोख ५,०००/- रु., मुकुट, चषक आणि प्रमाणपत्र, बेस्ट स्माईल रोख ३०००/- रु. चषक व प्रमाणपत्र, बेस्ट पर्सनॅलिटी रोख ३०००/- रु. चषक व प्रमाणपत्र बेस्ट कॉस्च्युम रोख ३०००/- रु. चषक व प्रमाणपत्र, बेस्ट फोटोजेनिक फेस रोख ३०००/ रु. चषक व प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धेसाठी नावनोंदणीची अंतिम तारीख १८ एप्रिल आहे. नोंदणी व माहितीसाठी सौ. चारुशीला आचरेकर 9404344322, लक्ष्मीकांत खोबरेकर – 9422946212, मेघा गावकर 9422379771 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा