You are currently viewing “शिव उद्योग स्वराधिश १.० कराओके राज्यस्तरीय स्पर्धा”

“शिव उद्योग स्वराधिश १.० कराओके राज्यस्तरीय स्पर्धा”

*शिव उद्योग संघटना आणि मराठी साहित्य व कला सेवा देणार नवोदित गायकांना संधी*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

प्रत्येकाच्या हाताला काम हा एकच ध्यास घेऊन देशात कार्यरत असणारी “शिव उद्योग संघटना” आणि मराठी साहित्य आणि कला क्षेत्रात नवोदितांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कार्यरत असणारी “मराठी साहित्य व कला सेवा” यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील गायकांसाठी एक सर्वोत्तम संधी अर्थात “शिव उद्योग स्वराधिश १.० कराओके राज्यस्तरीय स्पर्धा” जाहीर करण्यात आली आहे.

तीन फेर्‍यांमध्ये रंगणाऱ्या ह्या स्पर्धेसाठी १६ ते ५० वयोगटातल्या स्पर्धकांना सहभाग नोंदवता येईल. नावनोंदणीची अंतिम तारीख २५ मे २०२४ आहे. स्पर्धा शुल्क ₹३००/- आहे. स्पर्धेची अंतिम फेरी मुंबई येथे १३ जुलै २०२४ होणार आहे. स्पर्धेच्या विजेत्यांना रोख रकमेसोबतच, आकर्षक सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गुरुदत्त वाकदेकर ९९८७७४६७७६ ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

प्रतिक्रिया व्यक्त करा