You are currently viewing मयुर गवळीना युवा कला गौरव पुरस्कार जाहिर

मयुर गवळीना युवा कला गौरव पुरस्कार जाहिर

सावंतवाडी
आर्ट बिटस् फाऊंडेशन पुणेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची नावे नुकतीच जाहिर झाली असुन यंदा हा पुरस्कार सिंधुदुर्गाचे सुपुत्र आणि दशावतारातील सध्याचे लोकप्रिय हार्मोनियम वादक मयुर गवळी याना जाहिर झाला आहे.
आपल्या सुरेल आवाजातुन दशावतार लोककलेच्या माध्यमातून भाव अंतरीचे हळवे हे गाणे लंगार नृत्याच्या माध्यमातून मोठ्या उंचीवर नेत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे गवळीना लोककलेतील योगदानासाठी हा पुरस्कार देवुन गौरविले जाणार आहे. मयुर गवळीना जाहिर झालेल्या युवा कला गौरव पुरस्कारा बद्दल त्यांचे विविध स्तरांतुन अभिनंदन होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा