You are currently viewing राष्ट्रीय महामार्ग खारेपाटण विभागाच्या कार्यालयाला टाळे…

राष्ट्रीय महामार्ग खारेपाटण विभागाच्या कार्यालयाला टाळे…

कणकवलीतील रिक्षा व्यावसायिकांचे आंदोलन

कणकवली

शहरातील एसटी स्टँडसमोर रिक्षा स्टँड साठी जागा देत नसल्याच्या विरोधात रिक्षाचालकांनी हायवेच्या खारेपाटण येथील ऑफिसला टाळे ठोकले. तसेच कार्यालयासमोर सकाळी दहा वाजल्यापासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
हायवे चौपदरीकरणानंतर कणकवली एसटी स्टँडसमोरील रिक्षा स्टँड ची जागा निश्चित करून मिळावी यासाठी रिक्षाचालकांनी ओरोसला उपोषण केले होते. त्यानंतर रिक्षा स्टँडची जागा निश्चित करून जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले. मात्र नॅशनल हायवेच्या लाल फितीच्या कारभारामुळे अद्याप रिक्षा स्टँड ला जागा मिळालेली नाही. अखेर आज कणकवली एसटी स्टँडसमोरील रिक्षा चालकांनी नॅशनल हायवेच्या खारेपाटण येथील ऑफिसवर धडक दिली. तेथील अधिकाऱ्यांनी कणकवलीचे क्षेत्र आपल्या कार्यकक्षेत येत नसल्याचे शासकीय उत्तर देताच भडकलेल्या रिक्षाचालकांनी जोवर नॅशनल हायवे कार्यकारी अभियंता येत नाहीत तोवर खारेपाटण मधून हटणार नाही असे म्हणत नॅशनल हायवे च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ऑफिसबाहेर काढत ऑफिसला टाळे ठोकले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रीतम मोरे, प्रभाकर चव्हाण, संजय जाधव, प्रभाकर राणे, कृष्णा परब, हेमंत वावळीये, सचिन सावंत, दीपक कोरगावकर, मंगेश कोरगावकर, रमेश मसुरकर, कैलास तळवडेकर, मंगेश मोरये, अमित जाधव, दिलीप गावडे, अवी जाधव, प्रमोद गावडे, महेंद्र तेली, सदाशिव सावंत, केदार आळवे आदींसह ५० हून अधिक रिक्षाचालक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 8 =