You are currently viewing चला पुन्हा एकदा वेंगुर्ले शहर स्वच्छतेमध्ये नंबर एक बनवूया…! मुख्याधिकारी पारीतोष कंकाळ

चला पुन्हा एकदा वेंगुर्ले शहर स्वच्छतेमध्ये नंबर एक बनवूया…! मुख्याधिकारी पारीतोष कंकाळ

शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन…

वेंगुर्ला

चला पुन्हा एकदा स्वच्छतेमध्ये राहिलेल्या त्रुटी दूर करून आपण सर्वांनी एक दिलाने वेंगुर्ले शहराचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करूया. स्वच्छतेच्या दुस-या टप्यात राज्यस्तरावर शहर सौंदर्यीकरण स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन वेंगुर्ल्याचे स्वच्छतेतून सुंदर नाव नंबर एक ला नेऊ, असे सांगत सर्वांनी साथ द्या, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरीषदेचे नुतन मुख्याधिकारी पारीतोष कंकाळ यानी पत्रकार परिषदेत केले. वेंगुर्ला नगरपरिषद ही स्वच्छतेचा वसा कायम ठेवून सौंदर्यीकरणात सुध्दा राज्यात नावलौकीक करेल, आपण नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर येथील असलेल्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू केला आहे. नगरपरीषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत कंकाळ बोलत होते.

स्पर्धेच्या अनुषंगाने वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मुख्य रस्त्याच्या ठिकाणी आकर्षक अशा स्वरूपाचे कोकणची संस्कृती व वेंगुर्ल्यातील पर्यटन स्थळे दर्शविणा-या वॉलपेटींग तसेच मुख्य चौक सुशोभिकरण करणे अशा काही गोष्टी करण्यात येणार आहेत. यामध्ये स्थानिकांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात कचरा संकलन केंद्रामधील व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाला होता. त्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले होते. गेल्या १५ दिवसांपूर्वी पदभार स्विकारल्यानंतर आपण सर्व प्रथम कंपोस्टबाग म्हणजे स्वच्छ पर्यटन स्थळाकडे लक्ष केंद्रीत केले. या कचरा संकलन केंद्रातील ब्बायोगॅस प्रकल्प, बायो कंपोस्टिंग मशिन, लॅस्टिक बेलिग मशिन, एस.टी.पी.लँट, लॅस्टिक क्रशर मशिन या बंद अवस्थेत असल्याने या कचरा संकलन केंद्रात कचऱ्याचा ढिग जमा झाला होता. त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने सर्व मशिनरी चालू करण्यात आल्या असून उर्वरीत एक-दोन मशिनरी आवश्यकतेनुसार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती श्री.कंकाळ यानी दिली.

शहरातील कुत्र्याचे निर्बिजीकरणाचे अभियान राबविण्यात येणार आहे. सुमारे ८०० कुत्र्याचे निर्बिजीकरण येथे केले जाणार आहे. त्याचप्रमाणे नगरपरिषदेचे बंद दुकान गाळे चालू करण्यासंदर्भात प्रयत्न करणे. सागर रिसॉर्ट, संगित रिसॉर्ट हे येणा-या अडचणी दूर करून पुन्हा चालू होण्यासंदर्भात प्रयत्न चालू आहेत. स्विमिग पुल येथे खराब झालेले शौचालय व बाथरूम सुस्थितीत करणे, नगरपरीषद टॉवर वरील बंद अवस्थेत असलेली घडयाळे सुरू करणे, बंद असलेले एल.ईडी. वॉल डिस्ले सुरू करणे, मच्छिमार्केटमधील कोल्ड स्टोअरेज, सक्शन हॅन, पार्किांग, वॉटर ए.टी.एम. इत्यादी ठेकेदारी पध्दतीने चालू करण्याचा प्रयत्न आहे.

या स्वच्छ भारत पर्यटन स्थळाच्या ठिकाणी कच-याच्या माध्यमातून आलेल्या प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, गाड्यांचे टायर तसेच अन्य टाकावू वस्तुपासून घोडा, हत्ती, रणगाडा यासह लक्षवेधी अशा ब-याच कलाकृती बनविण्यात आल्या आहेत. या पैसे देवून केलेल्या नाहित तर ठेकेदारी पध्दतीत काम करणा-या ऋषिकेश बाबुराव जाधव यांनी आपल्या अंगातील कलागुणाद्वारे साकारल्या आहेत. या व्यतिरिक्त प्रशासकिय इमारत, भाजी मार्केट व मच्छिमार्केट या भागात बसविण्यात आलेल्या फायर हायड्रट प्लांटचे टेस्टींग झालेले असून ते आता कोणत्याही क्षणी वापरता येणारे आहे. तसेच कॅम्प येथील फायर स्टेशनमध्ये अग्निशामक गाडीत त्वरीत पाणी भरण्यासाठी लागणारे हायड्रट पॉईंट मागविण्यात आलेले असून नादरूस्त झालेल्या अग्निशामक बाईक दुरूस्त करण्यात येणार आहेत.

शहरात बाजारपेठ भागात भाजी मार्केटमध्ये किरकोळ व्यापा-यासाठी प्रति चौरस मीटरच्या लाईन नव्याने मारण्यात आल्या असून प्रत्येक भाजी व तत्सम माल विक्रीसाठी जागा उपलब्द होईल. नगरपरीषद मार्केटच्या भागात रस्त्यावर माल विक्री करणा-यांनी माल विक्रीसाठी नगरपरीषदेच्या जागेतच बसावे असे माल विक्रेत्यांना, तसेच बाजारपेठेत माल खरेदी-विक्रीसाठी आलेल्या ग्राहक व व्यापा-यांनी त्याचप्रमाणे कामानिमीत्त बाजारपेठ भागात आलेल्या नागरीकांनी आपली वाहने नगरपरीषदेच्या वाहनतळाच्या ठिकाणी पार्किग करून सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी श्री. कंकाळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + thirteen =