You are currently viewing दोडामार्गातुन  गोव्यात कामानिमित्त ये – जा करत असाल तर दोन दिवसांची मुदत 

दोडामार्गातुन  गोव्यात कामानिमित्त ये – जा करत असाल तर दोन दिवसांची मुदत 

तपासणी नाक्यावर रोखले जाईल 

आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची, मोफत टेस्टची सुविधा 

एकदा टेस्ट केल्यावर दहा दिवस दिवस जाता येईल गोव्यात 

तहसीलदार श्री. खानोलकर यांची माहिती, दोन दिवसांत टेस्ट करण्याचे आवाहन 

दोडामार्ग 

दोडामार्ग तालुक्यातून गोव्यात कामानिमित्त गोव्यात ये जा करणाऱ्यांचे  प्रमाण अधिक आहे.  आताच्या लॉकडाऊन मध्ये गोव्यात ये जा करणाऱ्याना मुभा होती मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता गोव्यात ये जा करण्यासाठी फक्त दोन दिवस मुभा मिळणार आहे.

तशा सूचना सोमवारी सायंकाळपासून चेकपोस्टवर देण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसानंतर जर कामानिमित्त गोव्यात ये जा करायचे असल्यास आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची करण्यात आली. एकदा टेस्ट केल्यावर पुढील दहा दिवस मुभा मिळणार आहे. अशी माहिती दोडामार्ग तहसीलदार श्री. खानोलकर यांनी दिली.
श्री. खानोलकर म्हणाले, आरटीपीसीआर टेस्ट ची सुविधा दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात असून ती मोफत आहे. शिवाय दोडामार्गसह उद्यापासून नव्याने आयी आणि सासोली याठिकाणी नव्याने चेकपोस्ट नाके उभारले जाणार आहेत. त्यामुळे सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे. आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी सुलभ सुविधा मिळेल कोणाचीही गैरसोय होणार नसल्याचेही श्री. खानोलकर यांनी सांगितले.
तर पेट्रोलसाठी मुभा मिळेल का ? यावर बोलताना श्री. खानोलकर यांनी पोलीस प्रशासनाशी बोलून त्याविषयी सविस्तरपणे माहिती दिली जाईल असे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 4 =