You are currently viewing आधुनिक युगात टिकायचं असेल तर प्रत्येक क्रीडा शिक्षकाने तंत्रस्नेही व्हावे -डाॅ.पारगावकर….

आधुनिक युगात टिकायचं असेल तर प्रत्येक क्रीडा शिक्षकाने तंत्रस्नेही व्हावे -डाॅ.पारगावकर….

राज्यस्तरीय तंत्रस्नेहीकार्य सन्मान सोहळ्यात प्रतिपादन…..

कासार्डे :

महाराष्ट्र शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनेलने ऑनलाईन शारीरिक शिक्षण विषयाचा चांगला प्लॅटफॉर्म तयार केला असून यामुळे विद्यार्थ्यांच्या बरोबरच शिक्षकांही त्यांच्या श्रुजनतेला,अंगभुत कौशल्याला तंत्रज्ञाची जोड देऊन व्यक्त होण्यास मोठा वाव मिळणार आहे.
आजच्या आधुनिक युगात टिकायचं असेल तर प्रत्येक शारीरिक शिक्षण शिक्षकाने तंत्रस्नेही बनायलाच हवे असे आवाहन शारीरिक शिक्षण महाविद्यालय वडाळा मुंबईचे, प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ पारगावकर यांनी केले.
-डाॅ.पारगावकर महाराष्ट्र शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनेल आयोजित राज्यस्तरीय तंत्रस्नेही कार्य सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या आॅनलाईन झालेल्या सोहळ्याला पॅनल प्रमुख राजेंद्र कोतकर(अ.नगर) चंद्रकांत पाटील(, पिंपरी-चिंचवड),आनंद पवार (धुळे) प्रमोद पाटील (पालघर) ,घन:श्याम सानप(अ.नगर), राजेश जाधव (जळगाव) ,राजेंद्र पवार (सातारा),रोहीत आदलिंग(अ.नगर), बयाजी बुराण, दिनेश म्हाडगुत( सिंधुदुर्ग), साक्षी कामटेकर, महेश सूर्यवंशी, रणजीत पाटील यांच्यासह 12 पुरस्कार विजेते व सत्कार मूर्ती तसेच राज्य तंत्रस्नेही पॅनेल मधील बहुसंख्येने सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना पॅनेल प्रमुख राजेंद्र कोतकर म्हणाले की, या तंत्रस्नेही पॅनल मार्फत फक्त कोरोना काळातच नव्हे तर, यापुढे 365 दिवस शारीरिक शिक्षण या विषयाची ज्ञानगंगा ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.पारंपारिक, आधुनिक,विदेशी खेळांची सविस्तर माहिती
आंनददायी शिक्षणातून तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न
पॅनेलच्या माध्यमातून असणार असल्याचे मत श्री. कोतकर यांनी यावेळी व्यक्त केले.या पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन पॅनेलचे तंत्रस्नेही तज्ञ शिक्षक आनंद पवार यांनी केले.
यावेळी अनेक क्रीडा शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करून या अनोख्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + fourteen =