You are currently viewing ओम गणेश हाउसिंग सोसायटीच्या मुलांनी बनवला मातीचा आकर्षक किल्ला

ओम गणेश हाउसिंग सोसायटीच्या मुलांनी बनवला मातीचा आकर्षक किल्ला

कुडाळ :

 

ओम गणेश हाउसिंग सोसायटी शिक्षक कॉलनी इंद्रप्रस्थ नगर कुडाळ येथील मुलांनी आपल्या सृजनशीलतेला व कल्पकतेला वाव देत सुंदर असा मातीचा किल्ला बनवला. परिसरातील दगड, माती, वाळू यांचा उपयोग करून त्यांनी हा किल्ला बनवला आहे.

यामध्ये स्वराज व अभ्यंग धोंडी मसुरकर दूर्वा व शमिका भालचंद्र आजगावकर, दुर्वांक हृदयनाथ गावडे, रिया व विनायक धनंजय परब, यश व आदिश नवनाथ जाधव, शर्विल व वेदांत वरुटे, नुपूर व गोजिरी आनंद कर्पे, काव्या व दिव्या लाड, वेदा श्रावणी, मिहीर धामापूरकर, प्रथमेश जाधव या बालचमुंनी खूप मेहनत घेऊन हा किल्ला बनवला आहे.तसेच समर्थ व तस्मई या छोट्या बच्चूंनी सुद्धा आपल्या आईच्या कडेवर बसून किल्ला पाहण्यासाचा आनंद घेतला. सर्वांनी मिळून पैसे काढून मावळे विकत आणले. पुठ्ठ्याची घरे बनवून किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांची वस्ती दाखवली आहे. किल्ल्यावर असणाऱी पाण्याची सोय, राजदरबार, मंदिर किल्ल्यावर, केली जाणारी शेती या छोट्या छोट्या गोष्टी कल्पकतेने दाखवण्याचा प्रयत्न मुलांनी केला आहे.

या मुलांचे आई-वडील शिक्षक असल्याने त्यांना आपल्या आई-बाबांकडून मार्गदर्शन मिळते. या सोसायटीतील ही मुले मातृदिन, शिक्षक दिन, गुरुपौर्णिमा यासारखे विशेष दिन सुद्धा एकत्र येऊन साजरे करतात. कोजागिरी पौर्णिमेला सांस्कृतिक कार्यक्रम असतो. व त्यात ही मुले नाट्यछटा, गायन, वादन, नृत्य सादर करतात. विविध कलांमध्ये ही मुले निपुण आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा..

प्रतिक्रिया व्यक्त करा