You are currently viewing रत्नागिरी येथील नौकेवर मत्स्य विभागाची कारवाई

रत्नागिरी येथील नौकेवर मत्स्य विभागाची कारवाई

बंदी असताना जनरेटर, एल ई डी साहित्य आले आढळून

देवगड

महाराष्टड्ढ जलधी क्षेत्रात विना कागदपत्र वावर करीत असताना तसेच एलईडी मच्छिमारीस बंदी असतानाही नौकेवर जनरेटर व एलईडी साहित्य आढळून आल्याने १८ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वा.सुमारास मत्स्यविभागाच्या गस्तीपथकाने विजयदूर्ग समुद्रात ९ नॉटीकल सागरी मैलामध्ये शितल गस्तीनौकेच्या सहाय्याने रत्नागिरी येथील माशा अल्लाहा या नौकेला पकडले.
या नौकेवर तांडेलसह सात खलाशी असून ही नौका विना कागदपत्र महाराष्टड्ढ राज्याचा जलधी क्षेत्रात वावर करीत होती तसेच एलईडी मच्छिमारीस बंदी असतानाही या नौकेवर जनरेटर, एलईडी लाईट्स, बॅटèया, लोखंडी अँगल्स, लाईट सदृश साहित्य, सबमर्ज लाईटस आढळून आल्या.

नौकामालकाला मत्स्यव्यवसाय विभागाकडून नौकेसह सामान जप्तीची नोटीस देण्यात आली असून केंद्र शासन आदेशाचा भंग, विना कागदपत्र समुद्रात वावर,एलईडी मच्छिमारीस बंदी असतानाही मच्छिमारी करीत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.दंडात्मक कारवाईसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्याकडे प्रतिवेदन दाखल करण्यात येणार आहे.

ही कारवाई मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर, सागरी सुरक्षा रक्षक संतोष ठुकरूल, धाकोजी खवळे, अमित बांदकर, योगेश फाटक तसेच गस्ती नौका कर्मचारी यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा