You are currently viewing कोविड योद्धा संगीता परब यांचा अखेर कोरोनाने मृत्यू

कोविड योद्धा संगीता परब यांचा अखेर कोरोनाने मृत्यू

अवघ्या १५ दिवसांची चिमुकली झाली आईविना पोरकी : पंचक्रोशी गहिवरली

वेंगुर्ला
तालुक्यातील खवणे पागेरेवाडी येथील कोविड योद्धा संगीता परब व लग्नानंतरच्या सौ समृद्धी सुमित सावंत वय २९ वर्षे यांचा काल रविवारी जिल्हा रुग्णालयात कोविड कक्षामध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, ७ वर्षांचा मुलगा आणि अवघ्या १५ दिवसांची चिमुकली मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. तिच्या जाण्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

परिचारिका (नर्स) म्हणून त्या काम करीत असल्याने त्यांच्या विषयी जनमानसात आदरच स्थान होत. त्या स्वभावाने प्रेमळ, मनमिळावू व हसतमुख होत्या.भाजपा कार्यकर्ते संजय परब यांच्या त्या सुकन्या. अजगणी येथे त्यांचे माहेर पण मालवण कट्टा येथे आरोग्य विभागात कार्यरत असल्याने त्या म्हापण वरुन ये-जा करत. कोरोना काळात त्यांनी अनेकांना धीर दिला. तसेच रुग्णांच्या उपचारामध्ये कोणतीही कमी ठेवली नाही. दरम्यान प्रसूती नंतर आठ दिवसांनी तिला त्रास जाणऊ लागल्याने तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान काल रविवारी तिचे निधन झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा