You are currently viewing प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघातर्फे गायन आणि हस्ताक्षर स्पर्धा संपन्न 

प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघातर्फे गायन आणि हस्ताक्षर स्पर्धा संपन्न 

प्राधिकरण निगडी – दिनांक १३ रोजी प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघातर्फे, दादादादी विरंगुळा केंद्रामध्ये संध्याकाळी ४ ते ७ हस्ताक्षर स्पर्धा तसेच गायन स्पर्धेचे आयोजन केले गेले . हस्ताक्षर स्पर्धेमध्ये ५५ व गायन स्पर्धेमध्ये ३४ असे एकूण ८९ सभासद सहभागी झाले. हस्ताक्षर स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना शाळेतील परिक्षेची आठवण झाली. गायन स्पर्धेमध्ये, पहिली,दुसरी व तिसरी अशा तीन फेऱ्या झाल्या. उत्तेजनार्थ क्रमांक श्री.दिलीप गोसावी, व श्रीमती सुमन कुलकर्णी, तृतीय क्रमांक श्री. दत्तात्रय बरिदे, द्वितीय क्रमांक सौ.आशा नष्टे, व प्रथम क्रमांक श्रीमती रश्मी साटम यांनी पटकावला.स्पर्धेचे परीक्षण श्री. सचिन शिंगाडे तबला, हार्मोनियम व बासरीवादक विशारद तसेचं सौ.सुनिता करडे, संगीत विशारद यांनी केले.

प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघामध्ये पहिल्यांदाच काही तरी नवीन कल्पना राबवली, आणि त्याला उदंड यश लाभले.

ऐन दिवाळीच्या सणात सांस्कृतिक समिती प्रमुख सौ. ज्योती कानेटकर आणि सांस्कृतिक समिती सह प्रमुख श्रीमती माधुरी ओक यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचा उल्लेख संघाचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर जोशी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला , असेच काही वैविध्यपूर्ण उपक्रम भविष्यात हाती घेऊन यशस्वी करू शकतो याची खात्री पटली असेही त्यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा