You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील सहा शाळांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

वेंगुर्ले तालुक्यातील सहा शाळांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

तालुकास्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाला प्रतिसाद…

वेंगुर्ले:

तालुकास्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०२२ या महोत्सवात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या तालुकास्तरीय स्पर्धेत पहिल्या दिवशी तीन स्पर्धांमध्ये १८ शाळा सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी ६ शाळांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
सिद्धिविनायक मंगल कार्यालयात पार पडलेल्या या स्पर्धेत विजयी ठरलेल्या शाळांमध्ये “ज्ञानी मी होणार” लहान गट – शाळा पिंपळाचे भरड(तुळस प्रभाग), मोठा गट – परबवाडा नं.1(वेंगुर्ला प्रभाग) समुहगीत स्पर्धेत लहान गट – तुळस वेताळ (तुळस प्रभाग) मोठा गट- वजराट नं.1 (तुळस प्रभाग)
तर समुहनृत्य स्पर्धेत लहान गट – वेंगुर्ला शाळा नं.4 (वेंगुर्ला प्रभाग), मोठा गट – आडेली नं.1 (तुळस प्रभाग) यांचा समावेश आहे. या सहा शाळांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्यासह मान्यवर शिक्षकांच्या वतीने या गुणवंत विद्यार्थी व शाळांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 8 =