You are currently viewing बेळगावी येथे 4 ऑक्टोबर रोजी माजी सैनिक मेळावा

बेळगावी येथे 4 ऑक्टोबर रोजी माजी सैनिक मेळावा

बेळगावी येथे 4 ऑक्टोबर रोजी माजी सैनिक मेळावा

        सिंधुदुर्ग

मराठा रेजीमेंट सेंटर, बेळगावी यांच्या वतीने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता व वीरपिता यांच्यासाठी दि. 4 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 6.30 वाजता माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शिवाजी स्टेडियम, मराठा रेजीमेंट सेंटर, बेळगावी येथे होणार असून या मेळाव्यास इच्छुक माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता व वीरपिता यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

            या मेळाव्यात माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता व वीरपिता यांच्या विविध समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये निवृत्तीवेतन, SPARSH Portal संदर्भातील अडचणी, रोजगारविषयक मार्गदर्शन तसेच वीरनारी, वीरमाता व वीरपिता यांना उपलब्ध असलेल्या विविध सुविधा याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

            तसेच मेळाव्याच्या ठिकाणी विविध वैद्यकीय तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये नेत्ररोग (Eye), कान-नाक-घसा (ENT), शल्यचिकित्सा (Surgery), अस्थिरोग (Ortho), सर्वसाधारण औषधोपचार (General Medicine) तसेच ECHS संदर्भातील सुविधा उपलब्ध असतील. याशिवाय विविध बँकांचे स्टॉलही उभारण्यात येणार आहेत.

            अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या 02362-228820/ 8219285788  या दूरध्वनी क्रमांकावर अथवा व्हॉट्सॲप क्र. 8317350584 वर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा