पुण्यातील हृदयद्रावक घटना, कार धरणात कोसळल्याने आईसह ३ मुलींचा दुर्दैवी अंत

पुण्यातील हृदयद्रावक घटना, कार धरणात कोसळल्याने आईसह ३ मुलींचा दुर्दैवी अंत

पुणे

दररोज शेकडोच्या संख्येत महाराष्ट्रात अपघात होत असतात. काही अपघात हे चालकांच्या चुकीमुळे होत असतात तर काही अपघाताला खराब रस्ते जबाबदार असतात. असाच एक अपघात पुण्यातल्या पुणे पानशेत रस्त्यावर घडला आहे. चालकाकडून गाडीचं नियंत्रण सुटल्यानं धरणात गाडी कोसळून आईसह 3 मुलींचा दुर्देवी मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

एक कुटूंब पुणे पानशेत रस्त्यावरून जातं होतं. या रस्त्यावरून जाताना खडकवासला धरणाचं पाणलोट क्षेत्र लागतं. याच वेळी गाडीचं नियंत्रण सुटल्यानं गाडी पाण्यात पडली. या अपघातात एकाच कुटूंबातील 3 मुलींंचा आणि त्यांच्या आईचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली.

वडीलांना पोहता येत असल्यानं ते सुखरूप बाहेर पडले. त्यांनी त्यांच्या कुटूंबाला वाचवायचा प्रयत्न केला परंतू त्यांना आपल्या कुटूंबाला वाचवण्यास अपयश आलं. या घटनेची माहिती कळताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी गाडी बाहेर काढून तिन्ही मुलींचे मृतहेद बाहेर काढले.

दरम्यान, पोलिसांना आईचा मृतदेह सापडला नव्हता. पोलिसांनी स्थानिक मश्छिमारांच्या मदतीने शोधकार्य चालू ठेवले. रात्री उशिरा त्यांना आईचा मृतदेह सापडला. या मृतांमध्ये वैदेही, प्राजक्ता आणि प्रणिता अशी या तीन मुलींची नावे आहेत. तर आईचं नाव कल्पना असं आहे. पुण्याच्या दिशेने जात असताना हा अपघात घडल्याचं कळतंय.

प्रतिक्रिया व्यक्त करा