You are currently viewing वेंगुर्ले मठ रस्त्यावर दुचाकीस्वराची पादचार्‍याला धडक

वेंगुर्ले मठ रस्त्यावर दुचाकीस्वराची पादचार्‍याला धडक

दोघे गंभीर; वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नोंद

वेंगुर्ले

वेंगुर्ला होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज समोर वेंगुर्ला- मठ रस्त्यावर बुधवारी रात्री दुचाकीस्वराने पादचाऱ्याला ठोकरुन अपघात केला. या अपघातात वेंगुर्ले पेट्रोल पंप येथे टायर पंक्चर व्यवसायिक सी राजन नायर (अण्णा) हे गंभीर जखमी झाले. तर दुचाकी स्वार हा सुद्धा जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद वेंगुर्ले पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

वेंगुर्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्री नायर हे रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास आपला व्यवसाय बंद करून चालत घरी निघाले होते. त्याच दरम्यान वेंगुर्ले येथून मठ च्या दिशेने दुचाकी क्र MH 07 AQ 2965 वरील चालक चंदन सुहास परुळेकर रा. मठ परबवाडी हा भरधाव वेगाने जात होता. वेगामध्ये त्याने रस्त्याने चालणाऱ्या श्री. नायर यांना मागून जोरदार धडक दिली. मोटरसायकल नायर यांच्या पायाला आपटल्याने त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली. तर दुचाकीस्वार खाली कोसळला. त्याला ही दुखापत झाली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी अपघाताची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोघांना वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात उपचारा साठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून नायर याना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे तर दुचाकीस्वार परूळेकर याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान वेंगुर्ला पोलीस ठाण्यात भादवी कलम 279, 337, 338 व मोटर वाहन अधिनियम कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 2 =