You are currently viewing जलतरणपटू पूर्वा गावडेचा सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून सत्कार..

जलतरणपटू पूर्वा गावडेचा सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून सत्कार..

ओरोस :

राज्य व राष्ट्रीय स्तरावर जलतरण क्रीडा प्रकारात यश मिळविलेली सिंधुदुर्ग कन्या पूर्वा गावडे हिचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी अभिनंदन करत तिचा प्रशानाच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून जिल्ह्याचे व देशाचे नाव रोशन करावे अशा शुभेच्छाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

पुणे-बालेवाडी येथील क्रीडा संकुल मध्ये राष्ट्रीय प्रशिक्षण घेत असलेली सिंधुदुर्गनगरी येथील पूर्वा गावडे हिने जानेवारीमध्ये पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक जलतरण क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण व दोन कांस्य पदके पटकावली होती. अहमदाबाद येथे झालेल्या खेलो इंडिया वुमन सिरीज मध्ये दोन रौप्य पदके पटकावली होती. तसेच ओरिसा – भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेतही रौप्य पदक पटकावले होते. तर नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत रौप्य पदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. पूर्वा हीचे जलतरण क्रीडा स्पर्धेतील यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी पूर्वा गावडे हिला जिल्हाधिकारी कार्यालयात आमंत्रित करून जिल्हा प्रशासनाच्या वतीने तिचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, पूर्वाची आई सौ. रश्मी गावडे व वडील संदीप गावडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा