You are currently viewing श्री एकमुखी दत्त मंदिर सावंतवाडी येथे ०१ सप्टेंबर रोजी होणार श्री टेंब्ये स्वामी जयंती उत्सव
Oplus_16908288

श्री एकमुखी दत्त मंदिर सावंतवाडी येथे ०१ सप्टेंबर रोजी होणार श्री टेंब्ये स्वामी जयंती उत्सव

सावंतवाडी:

सावंतवाडी येथील प्रसिद्ध श्री एकमुखी दत्तमंदिर, सबनीसवाडा येथे मंगळवार दिनांक ०१ सप्टेंबर २०२६ रोजी श्री टेंब्येस्वामी महाराज जयंती उत्सव होणार असून सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमाचा व स्वामी दर्शनाचा सर्व स्वामीभक्तांनी अवश्य लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक देवस्थान उपसमिती सावंतवाडी यांनी केले आहे.

यावेळी सकाळी ८.०० वाजता श्री एकमुखी दत्तपूजा, अभिषेक, एकादशनी, ९.०० वाजता श्री.सत्यदत्त पूजा, दुपारी १२.३० वाजता आरती, १.०० वा. महाप्रसाद, सायंकाळी ५.०० वाजता माऊली भजन मंडळ बावळाटच्या सौ.रक्षंदा परब आणि सहकलाकार यांचा भजनाचा कार्यक्रम, ७.०० वा.नामस्मरण व आरती, ८.०० वाजता पालखी सोहळा, ९.०० वाजता स्थानिक भजन, १०.०० वा. श्री इस्वटी भजन मंडळ सबनीसवाडा यांचा भजनाचा कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा