You are currently viewing कळसुलकर हायस्कूलचे एन. सी. सी. कॅडेट्स नौसेना दिनाच्या रंगीत तालीमचे साक्षीदार

कळसुलकर हायस्कूलचे एन. सी. सी. कॅडेट्स नौसेना दिनाच्या रंगीत तालीमचे साक्षीदार

मालवण:

 

भारतीय नौसेना दिन २०२३ मुख्य सोहळ्यासाठी पहिली रंगीत तालीम सिंधुदुर्ग तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर सुरू असून वाईस चीफ ऑफ नेव्ही ऍडमिरल हरी कुमार यांच्या उपस्थितीत कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र या भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. डोळ्यांचे पारणे फिटून जातील असा नेत्र दीपक सोहळा भारतीय नौसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला असून आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे दर्शन विद्यार्थ्यांना कळसुलकर इंग्लिश स्कूलने घडून आणले आहे. या निमित्ताने ५८ राष्ट्रीय एन.सी.सी. बटालियन सिंधुदुर्ग नगरी ओरस व जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने कॅडेट्सना संधी उपलब्ध करून दिलेली होती.

यावेळी प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका श्रीमती एस जी सामंत राष्ट्रीय छात्र सेना अंशकालीन सेनाधिकारी फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =