You are currently viewing इंग्लिश खाडी टू वे पोहून जयंत दुबळे ने केला नवा विक्रम

इंग्लिश खाडी टू वे पोहून जयंत दुबळे ने केला नवा विक्रम

_*इंग्लिश खाडी टू वे पोहून जयंत दुबळे ने केला नवा विक्रम*_

तळेरे: प्रतिनिधी

महाराष्ट्राचा 22 वर्षीय आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू जयंत जयप्रकाश दुबळे ने आपल्या रिले टीम सोबत आज इंग्लिश खाडी पोहून नवा विक्रम केलेला आहे. इंग्लंड ते फ्रान्स व परत फ्रान्स ते इंग्लंड असे तब्बल 70 किलोमीटरचे अंतर 31तास 29 मिनिटांमध्ये पूर्ण करून आशियाई खंडातील पहिली टीम ठरून नवीन आशियाई विक्रम प्रस्थापित केलेला आहे. दिनांक 18 व 19 जुलै या दरम्यान जयंत ने आपल्या टीम सोबत हा विक्रम केला. या विक्रमाने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारताचे नाव आंतरराष्ट्रीय समुद्री जलतरणामध्ये अंकित करण्यात आले आहे. जयंत च्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जयंतच्या या समुद्री जलतरणाच्या विक्रमाने देशातील युवा जलतरणपटूंना ऑलम्पिक स्पर्धेत होणाऱ्या दहा किलोमीटरच्या समुद्री स्पर्धेसाठी प्रोत्साहन देणारे हे समुद्री जलतरण अभियान ठरेल, असा विश्वास जयंतने व्यक्त केला आहे. या अभियानातून ड्राव्हनिंग प्रिव्हेन्शन व रस्ता सुरक्षा बाबतचा संदेशही देण्यात आलेला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा