You are currently viewing देवबाग खाडी संगमाजवळ मासेमारी नौका उलटली…

देवबाग खाडी संगमाजवळ मासेमारी नौका उलटली…

दोघे बचावले; एक मच्छीमार बेपत्ता, शोधकार्य सुरू…

मालवण

देवबाग मोबारवाडी संगम समोरील खाडीत मासेमारी नौका उलटून देवबाग मोबारवाडी येथील विष्णू बळीराम राऊळ (वय- ५५) हे बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. त्यांचा मुलगा गौरव राऊळ आणि पुतण्या गंगेस राऊळ या दोघांना वाचविण्यात यश आले आहे. मासेमारी करून माघारी परतत असताना लाटेच्या तडाख्यात नौका उलटल्याने ही दुर्घटना घडली. बेपत्ता मच्छीमाराचा स्थानिक मच्छीमारांकडून शोध घेतला जात आहे. या घटनेची माहिती पोलीस पाटील भानुदास येरागी यांनी पोलिसांना दिली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा