You are currently viewing माशांनंतर मोती तलावात बगळा मृतावस्थेत…

माशांनंतर मोती तलावात बगळा मृतावस्थेत…

माशांनंतर मोती तलावात बगळा मृतावस्थेत…

सावंतवाडी

सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. साळुंखे यांनी नुकतेच तळ्यातील माशांच्या मरणाची टक्केवारी घटली असल्याचे विधान केल होते. मात्र काल संध्याकाळी या तळ्यातील एक बगळा पक्षी मृत अवस्थेत पहायला मिळाला. त्यामुळे मुख्याधिकारी यांनी केलेल्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ह्या बगळ्याचा कसा मृत्यू झाला याबाबत काही माहिती मिळाली नाही. मात्र नगर परिषदेच्या होडीमध्ये सदर मृत बगळा सायंकाळी सावंतवाडी नगरवासीयांना पाहायला मिळाला. त्यामुळे तळ्याच्या काठावर फिरणाऱ्या लोकांमध्ये हाच चर्चेचा विषय बनला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − two =