You are currently viewing आजोळच्या आठवणी

आजोळच्या आठवणी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लेख*

*आजोळच्या आठवणी*

विदर्भातील छोटासा तालुका आमचं आजोळ..अत्यंत ,प्रेमळ,मायाळू परिवार.आजोबांची शेतीवाडी व काही जोडधंदे ,अडत,लाकूड घेऊन लाकडी फर्निचर करून घेणं,असं असायचं.छानसं टुमदार घर,मागील पुढील अंगण..लागूनच गुरांचा गोठा,वासरांचा हंंबर,गडी माणसांची सारखी ये जा,दुध दुभतं,रतीब सतत वर्दळ असायची.मोठे मामा डाॅक्टर ,,तिथेच प्रॅक्टिस व मामी शिक्षिका.मावशा मामींनी, मुलांनी घराचं गोकुळच अगदी…
तेव्हाचं पर्यटन म्हणजे वडिलांच्या गावी किंवा आजोळी..सुट्या लागताच..आईची तयारी सुरू…
दोन्हीकडे आमचा भरपूर मुक्काम असे.आम्हा चारपाच भावंडांचे कपडे,काही चादरी,दसरा दिवाळीत स्वेटर्स
व इतर कपडे होल्डाॅलमधे बांधले जायचे.पत्र्याच्या पेटीत चांगले ,भारी कपडे,लग्न असेल सणवार म्हणून सोबत घेतलेले.
प्रवासात पितळी तांब्या असे.त्याला छोटा ग्लास व फिरकीचं झाकण असे.महामंडळाची बस मुख्य गावी पण छोट्या गावांना धी ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस अशी काहिशी नावं असलेली खाजगी बससेवा असायची.ते धी तेव्हा काही कळत नव्हतं.आजोळच्या गावी अशीच बससेवा..समोर लेडीज स्पेशल सीट्स असायच्या.पुरूषांना मोटारीत बसायला मागून दार असायचे.त्या बसेसला समोरून मोठे हॅंडल मारून सुरू करावे लागे.एव्हाना तिकीट काढून बसेपर्यंत हमाल बसवर होल्डाल व पेटी चढवत.दीड दोन तासात आम्ही सगळे हिरवी झाड,पळते डोंगर,खळाळत्या नद्या ओढे बघत,पक्षी मोजत व मैलाचे दगड बघत आजोळच्या गावी पोहोचत असू.
आमची वर्दी आधीच गेल्याने छोटा मामा घ्यायला आलेलाच असे.स्टॅंन्डकडे जातानाच आजोळचं घर कडेलाच दिसत असे..त्या बसमधूनच आम्ही ओसरीवर जमलेल्या गोतावळ्याला हात हलवून आम्ही आलोय मामाच्या गावी ,म्हणून
आनंदीत होत असू.आतापावेतो सहा सात तासांचा प्रवास गाड्या बदलत झालेला असे.
पोचताच आजी आजोबा हसतमुखानं स्वागत व चौकशी करत.अंगणात पाट मांडून व घंगाळात पाय धुवायला पाणी तांब्या ठेवलेला असे.टावेलने हातपाय पुसून घरात सर्वांना भेटून हास्य कारंजाचा एकच गलका व्हायचा.आजीकडील काही वेली भाज्या,बटमोगरा,अबोली,
माटाळूचा वेल ,पेरू सगळं एकदा फिरून बघायचं.आजीच्या विहिरीवर रहाट होता,तो दोन्ही हातांनी ओढून पाणी काढायचं.तुळशीजवळ पूजेत एक ओबडधोबड छोटा दगड होता,त्याला आजी शाळीग्राम म्हणून पूजा करायची.तेव्हापासून तो शब्द व इतिहास ठाऊक झाला.आजी गोष्टी खूप रंगवून सांगायची.गोड गळा तिचा..रामाच्या आरत्या सुंदर म्हणायची.सौंदर्यदृष्टी व रंगसंगती,कलानिपुण होती आजी..‌‌.‌साक्षात अन्नपूर्णा!..
थोडंस बसून प्रवसाचा शीण गेला की, गरमागरम ..गंजाच्या थालिपीठाचा खभंग वास दरवळायचा…गोड लोणचं,दही,लोण्यासह त्यावर ताव मारायचा.दुपारी खायला,खेळून आल्यावर हाताने घातलेल्या तिळतांदुळाच्या खमंग पांढ-या चकल्या,कच्चा चिवडा,कांदा कोथिंबीर घालून फारच चवदार लागायचा.कधी सातूचं पीठ व गोड लोणचं घालून चिवडा व्हायचा,तर कधी दाळव्याची पूड घालून पण चिवडा आवडीचा प्रकार सगळ्यांचा‌…चुलीवर केलेले गरमागरम टम्म फुगलेले छोटे छोटे पानगे साजूक तूप लाल सुक्या लाल मिरच्यांची भरपूर लसूणजीरं मीठ घालून लसणाचं तिखट बघूनच,भूक प्रदीप्त व्हायची .
गव्हाच्या चिकाची दूध साखर घालून केलेली म ऊसूत रेशमी अमृतपोळी खावी तर आज्जीच्याच हातची.चुलीवरील गरमागरम भाकरी ,ताकाचं पिठलं,कढवलेलं तेल त्यात लाल सुक्या मिरच्या.‌‌..तोंडाला पाणीच सुटायचं.तिळगुळाच्या करंज्याही खास आमच्यासाठी आजी करून ठेवायची ……रोज वेगळं ,साधंसं पण आम्हा नातवंडांच्या आवडीचं , ताजं गरमागरम फराळ व जेवण मनसोक्त असे.एक दोन दिवस मामासोबत शेतातले……ओल्या मातीत फिरायचं,बोरं,चिंचा तोडायच्या.काटे बोचले की काढायचे…तो एक शेतात फिरल्यावरचा कार्यक्रम असे.संध्याकाळी मोठे मामा सर्वांना एकत्रित करून देवघरात आरती करत.व रात्री सगळे एकत्र जमून गप्पा गोष्टी,गाणे,नकला,विनोद असे कलादर्शन व मनमोकळी विचारपूस होई.
सगळ्या नातवंडांसाठी एकच ताग्यातील कापड आणून टेलरला बोलावून ,मशीन घरी आणून आमचे नवे कपडे शिवले जायचे.निघतांना आईला कुंकू लावून नवीन साडी व ओटी भरून ,बांगड्या भरुन फराळाच्या डब्यासह आमची रवानगी पुन्हा बस कडे होत असे….सर्वांसोबत मनमुराद खेळतांना,हसतांना,बागडतांना,.बंगईवर झोके व गाणी म्हणतांना धम्माल वाटायची.
आता निघायचं म्हणून मन खट्टू होत असे.आजी आजोबा व मोठ्यांना नमस्कार करून ,दिलेला खाऊ,पैसे, फ्राॅकच्या खिशात ठेवत जड अंत:करणाने निरोप घ्यायचा.‌..
पुन्हा सुटी कधी लागते याची वाट बघत…..!आजोळची गोडीच अवीट खरं…!!अर्धशतक उलटलं पण आठवणी आजोळच्या मात्र हिरव्यागार
सदाबहार आहेत….!!
०००००००००००००००
अरुणा दुद्दलवार ✍️

_________________________
*संवाद मीडिया*

🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨

*कला क्षेत्रात करिअर करायचंय?*

*🧭 १०वी-१२वी नंतर पुढे काय?*

*कलेची आवड आहे, पण पुढचं काय करायचं हे कळत नाही?*
*तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरेल.*

*_कला क्षेत्रात जर तुम्हाला उच्च शिक्षणासाठी डिग्री कोर्स (Bachelor of Fine Arts – BFA) करायचा असेल, तर CET (कॉमन एंट्रन्स टेस्ट) देणे आवश्यक आहे. मात्र, फक्त परीक्षा देणे पुरेसे नाही – या परीक्षेत उत्तम स्कोअर मिळवणेही तितकेच महत्त्वाचे असते, कारण प्रवेश स्कोअरच्या आधारेच दिला जातो._*

*🏫 कोर्सची गरज का आहे?*

*कला क्षेत्र हे केवळ चित्रकला पुरते मर्यादित नाही. या क्षेत्रात विविध आधुनिक आणि सर्जनशील शाखा उपलब्ध आहेत, जसे की:*

*▪️अ‍ॅडव्हर्टायझिंग अँड ब्रँडिंग*

*▪️अ‍ॅप डिझाईन व UI/UX*

*▪️पॅकेजिंग डिझाईन*

*▪️टायपोग्राफी व कॅलिग्राफी*

*▪️फिल्म मेकिंग व सेट डिझाईन*

*▪️अ‍ॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स*

*▪️आर्ट डिरेक्शन*

*▪️स्कल्प्चर व सिरॅमिक आर्ट*

*▪️इंटिरिअर आणि टेक्सटाईल डिझाईन*

*▪️क्रिएटिव्ह इलस्ट्रेशन व डूडलिंग*

*या सर्व शाखांमध्ये करिअर करण्यासाठी मूलभूत कौशल्य आणि योग्य मार्गदर्शन गरजेचे असते. म्हणूनच, फाउंडेशन कोर्स हा एक आवश्यक टप्पा ठरतो.*

*👨‍🎓 कोण सहभागी होऊ शकतो?*
*जे विद्यार्थी १०वी उत्तीर्ण झाले आहेत आणि*

*जे विद्यार्थी १२वीच्या परीक्षेनंतर कला क्षेत्रात प्रवेश घ्यायचे ठरवत आहेत,*

*तसेच ज्यांना कलेची खरी आवड आहे – असे सर्व विद्यार्थी या कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात.*

*११वीचा अभ्यास चालू असतानाच, संध्याकाळच्या वेळेत (सोमवार ते शनिवार, सायंकाळी ३ ते ६) हा कोर्स करता येतो. त्यामुळे शालेय अभ्यासावर परिणाम न होता, CET ची योग्य तयारी करता येते.*

*📌 फाउंडेशन कोर्सचे फायदे:*
*CET परीक्षेसाठी योग्य दिशा आणि सखोल मार्गदर्शन*

*कला आणि डिझाईनच्या विविध शाखांची ओळख*

*अनुभवी प्रशिक्षक व प्रात्यक्षिकांद्वारे शिक्षण*

*स्थळ – बी एस बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट (अप्लाईड) सावंतवाडी , फॉरेस्ट ऑफिस जवळ, सालईवाडा, सावंतवाडी*

*📞 नोंदणीसाठी संपर्क: 9420260903*
*9405830288*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/208255/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा