You are currently viewing बाप नावाचा माणूस

बाप नावाचा माणूस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रदीप जोशी लिखित भावस्पर्शी लेख*

*बाप नावाचा माणूस*

वडील हा प्रत्येकाच्या आयुष्यातील हळवा कोपरा. आईचे कष्ट दिसून येतात मात्र वडिलांची यातायात दिसून येत नाही. बाप हा तसा दुर्लक्षित घटक. म्हणूनच मी आपल्यापुढे माझ्या विचारातून मांडत आहे,”बाप नावाचा माणूस’.
प्रत्येकाला जन्म देण्यात आई बाप दोघांचे योगदान असते. आई संस्कार करत असते. बाप कशाचीही कमतरता भासू देत नाही. सारे आईचे कौतुक करतात. बापाची धडपड मात्र कोणालाच दिसत नाही. दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या बापाच्या हाताला पडलेले घटे फारच थोड्या जणांना दिसतात. आपल्या अंगावरील फाटक्या कपड्याचा थोडा देखील विचार न करता घरात काही कमी पडणार नाही ना हाच ध्यास घेतो तोच बाप असतो.
स्वतः उपाशी राहून घर कसे प्रसन्न राहील ही ज्याची विचारधारा असते तो बाप असतो. आजवर विविध घटकांचे काव्यातून कौतुक झाले आहे मात्र बाप तसा दुर्लक्षितच राहिला आहे. त्यालाही मन असते. त्यालाही भावना असतात. त्या व्यक्त करायला त्याच्याकडे शब्दसाठा फारसा नसतो. दुःखी घटनांमुळे तो खचतो पण डोळ्यात अश्रू दिसून देत नाही. त्याला कुटुंबाला आधार द्यावयाचा असतो. मुलीच्या लग्नात सर्वात जास्त कोण रडत असेल तर तो बाप. त्याच्यावर माया प्रेम करणारी त्याची मुलगीच असते. अनेक पातळ्यांवर बापाला सामना करावा लागतो.
बाप म्हातारा झाला की हतबल होतो मात्र आपला स्वाभिमान तो सोडत नाही. सूनाकडून होणारा शाब्दिक छळ तो आपल्या मुलासाठी नातवंडासाठी निमूटपणे सहन करत असतो. त्याला घर अभेद्य रहावे असेच वाटत असते. आई जन्मदात्री असते तर बाप जन्मदाता असतो. बापाचे राहणीमान अगदी साधे असते. तो कोणत्याही गोष्टीच्या आहारी जात नाही. त्याला फक्त कर्तव्य माहीत असते.
आधार तुटल्यावर बापाचे खरे महत्व कळते. आयुष्यभर पोरासाठी कष्ट उपसणारा बाप म्हातारपणात ज्यावेळी वृद्धाश्रमात ठेवला जातो त्यावेळी त्याच्या मनाची किती घालमेल होत असेल. त्याच्या मनाला किती यातना होत असतील याचा विचार समाजात फारसा केला जात नाही. बापाच्या जीवावर वैभव उपभोगणाऱ्या घटकांना बापाचे महत्व ज्यावेळी समजेल तो खरा सुदिन मानावा लागेल. प्रत्येकाच्या जीवनात बापाला एक आगळे वेगळे महत्व असते. बाप हा कुटुंबाचा भक्कम आधार असतो. त्याच्या मृत्यूनंतर जी पोकळी निर्माण होते ना ती कधीच भरून निघणारी नसते. तो कडक असला तरी प्रेमळ असतो. त्याने पाठीवर टाकलेली थाप नवी उमेद देवून जाते. आपण लहान असताना आपल्या बोटाला धरून चालायला शिकवणारा बाप, त्याच्या वृद्धावस्थेत मुलाकडून तीच अपेक्षा करत असतो. ज्यावेळी अपेक्षा भंगाचे दुःख त्याच्या पदरी येते त्यावेळी त्याला जगणे देखील असह्य होते.
माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला बापाची ओळख करून देताना थोडी देखील लाज वाटता कामा नये. आजकालची पिढी त्यांना डस्टबीन समजते. आपल्या हिंदू संस्कृतीत मातृ देवो भव, पितृ देवो भव असे म्हणतात. एक गोष्ट मात्र खरी की बाप हा बापच असतो. प्रत्येक पुरुष कुणाचा ना कुणाचा बाप असतो. तो आपली कर्तव्ये पार पाडत असतो. काही वेळेस त्याचे अस्तित्व घरात पैसे कमवून देण्या इतपत असते. कुटुंब प्रमुख असला तरी तो कोणतीही अपेक्षा ठेवत नाही. अशा बाप नावाच्या माणसाला माझा शतशः प्रणाम.
=========================
नाव – प्रदीप गजानन जोशी
गाव-विटे, ता. – खानापूर, जि. सांगली
मोबाईल- 9881157709

________________________
*संवाद मीडिया* 

*प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!!*

*कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण*
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आणि स्थापनेपासून *”अ”* दर्जा प्राप्त महाविद्यालये

*बारावी नंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू….!!!*

1) *गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण.*
*कॉलेज कोड:* *11165*
अभ्यासक्रम.
कृषी पदवी- BSc. (Hons.) Agriculture
प्रवेश क्षमता- 180
संपर्क : 9421154594 9421230915 9405071319
www.gncamp.org

2) *जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी पालवण*. *देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय*
*कॉलेज कोड:* *11311*
अभ्यासक्रम.
कृषी पदवी- BSc. (Hons.)Agriculture
प्रवेश क्षमता- 60
संपर्क : 8600879426 7588868705
www.jwcagri.org

3) *डॉ.बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मांडकी पालवण*
*कॉलेज कोड:* *15196*
अभ्यासक्रम.
कृषी अभियांत्रिकी पदवी-(Agricultural engineering)
प्रवेश क्षमता- 80
संपर्क: 9421154594 7588868705
www.dbmcaetmp.org

*टीप : इच्छुक विद्यार्थ्यांचे फॉर्म कॉलेजमध्ये भरून देण्यात येतील*

कॉलेज व्हिडिओ
https://youtu.be/STjqIuIBdmU?feature=shared
*प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी आमच्या महाविद्यालयाचे व्हाट्सअप channel जॉईन करा*
https://whatsapp.com/channel/0029Vb2OWKRJENxsbWsAQ41a

*खालील संकेतस्थळावरती जाऊन आपण आपल्या कॉलेज चा पर्यायी नंबर 11165,11311, 15196 टाकून प्रवेश निश्चित करू शकता.*

https://auth-2026.maharashtracet.org/realms/mh-cet/protocol/openid-connect/auth?client_id=central-launchpad&redirect_uri=https%3A%2F%2Fportal-2026.maharashtracet.org%2F&state=4e898dd9-f749-436d-b3e1-3417f5632f77&response_mode=fragment&response_type=code&scope=openid&nonce=9a40d12f-fa5a-4b43-b7f0-762fb2b9ded5

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/209787/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा