विटा नगरपरिषदेकडून अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप : नागरिकांचे निवेदन
( प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार ) :
विटा शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत नगरपरिषद प्रशासनाने सर्वांना समान न्याय देण्याऐवजी राजकीय हस्तक्षेपामुळे निवडक नागरिकांवरच कारवाई होत असल्याचा गंभीर आरोप करत नागरिकांच्या शिष्टमंडळाने आज मुख्याधिकारी, विटा नगरपरिषद यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, विटा शहरामध्ये नगरपरिषदेमार्फत अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू असून शहरातील सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर कोणताही भेदभाव न करता समान निकषांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात काही राजकीय वरदहस्त असलेल्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करून सामान्य व्यावसायिक व नागरिकांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, अतिक्रमण हटविण्याची कारवाई सर्वांवर समान पद्धतीने व पारदर्शकपणे करण्यात यावी. कोणत्याही राजकीय दबावाखाली निवडक कारवाई होऊ नये. अन्यथा नागरिकांना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
तसेच यावेळी नगरपरिषद प्रशासनाने विटा मायणी रोडलगतच्या मिळतकधारकांना नुकत्याच अतिक्रमण काढुन घेण्याबाबतच्या बजावलेल्या नोटीसबाबतही चर्चा करण्यात आली .सदरची कारवाईही कोणताही भेदभाव न करता समान न्यायाच्या तत्वावर केली पाहीजे असे आग्रही प्रतिपादन शिष्टमंडळाने केले.तसेच या रस्त्याच्या रुंदीकरणात विस्थापित झालेल्या खाद्यपदार्थ हातगाडीचालकांचे हातावरचे पोट विचारात घेऊन त्यांच्यावर कोणताही अतिरीक्त भुर्दंड न बसवीता त्यांचे व्यावसायीक पुनर्वसन करावे अशीही जोरदार मागणी करण्यात आली.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर,माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अजित गायकवाड, नगरसेवक सुमित गायकवाड , अविनाश चोथे प्रशांत कांबळे, राहुल हजारे, माधव रोकडे, अमित भोसले, दहावीर शितोळे, इत्यादी उपस्थित होते
निवेदन स्वीकारल्यानंतर मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी याबाबत योग्य व समान न्यायानेच कार्यवाही करण्याचे शिष्टमंडळास आश्वासीत केले आहे.
अतिक्रमण हटविण्याची कारवाई सर्वांसाठी समान निकषांवर करावी.
राजकीय दबावाखाली निवडक कारवाई करू नये.
शहरातील सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर निष्पक्ष व पारदर्शक कारवाई करावी.
अन्यथा नागरिक लोकशाही मार्गाने आंदोलन छेडतील, असा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे.
_________________________
*संवाद मीडिया*
*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.
*Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* कॉलेज मध्ये
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2026-2027*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*
*COLLEGE CODE-6191*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
*Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.*
*• Duration : 4.5 Years*
*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*
👉 *सर्व मुलींना 100% ट्युशन फी आणि परीक्षा फी माफी.(शासन नियमानुसार)*
*पत्ता:*
*प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712*
*संपर्क:*
*9145623747*
*9420156771*
*7887561247*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/204353/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
