You are currently viewing मडुरा माऊली मंदिर नवरात्रोत्सव कार्यक्रमातील पैठणीच्या मानकरी सौ. लक्ष्मी विष्णू परब

मडुरा माऊली मंदिर नवरात्रोत्सव कार्यक्रमातील पैठणीच्या मानकरी सौ. लक्ष्मी विष्णू परब

बांदा

मडुरा येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त धार्मिक कार्यक्रमा बरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यावर्षी आकर्षक पैठणीच्या मानकरी सौ. लक्ष्मी विष्णू परब ठरल्या. गावातील सुवासिनींच्या उपस्थितीत झालेली पणत्यांची महाआरती लक्षवेधी ठरली. उत्सव काळात हजारो भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घेतला. मडुरा ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात गेले आठ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

बाळकृष्ण गोरे दशावतार, चेंदवणकर दशावतार, इन्सुली माऊली दशावतार, पार्सेकर दशावतार व नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळांचे नाट्यप्रयोग संपन्न झाले. अणसूर येथील संगीत विशारद दिप्तेश मेस्त्री यांचा सुमधूर भजनाचा कार्यक्रम पार पडला. गावातील सुवासिनींच्या उपस्थितीत झालेली महाआरती सर्वाधिक लक्षवेधी ठरली. यावेळी पैठणीच्या मानकरी ठरलेल्या सौ. लक्ष्मी परब यांना माजी ग्रा. पं. सदस्या सौ. विनिता पावसकर यांच्या हस्ते आकर्षक पैठणी प्रदान करण्यात आली.

नवरात्रोत्सवाच्या उत्कृष्ट आयोजना बद्दल समिती अध्यक्ष अनंत परब यांचा देवस्थान समितीकडून सत्कार करण्यात आला. यावेळी समिती सचिव संतोष परब, दत्ताराम परब, सोमनाथ परब, विजय परब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पोलीस पाटील नितीन नाईक यांनी केले. उत्सव काळात हजारो भाविकांनी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + seven =