You are currently viewing जिजाई वस्तीस्तर संघाच्यावतीने गवंडीवाडा येथे आरोग्य तपासणी

जिजाई वस्तीस्तर संघाच्यावतीने गवंडीवाडा येथे आरोग्य तपासणी

सिंधुदुर्गनगरी

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापीत सिंधुकन्या लोक संचलित साधन केंद्र, नगर परिषद मालवण, दिनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविक अभियानअंतर्गत जिजाई वस्तीस्तर संघाच्यावतीने गवंडीवाडा येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरात 38 जणांनी लाभ घेतला.

          जिल्हा समन्वयक नितीन काळे, जिजाई वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष माधवी तिरोडकर, नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक, सिंधुकन्या सीएमआरसीच्या व्यवस्थापक गिता चौकेकर यांच्या उपस्थितीत शिबीराला सुरुवात झाली. सुरुवातीला राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.

          क्षेत्रीय समन्वयक खेमराज सावंत, संकल्प शहरस्तर संघाचे सदस्य स्नेहा मयेकर, दतात्रय मयेकर, हिंदू लॅब फ्लेबोटॉमिस्ट पूजा चव्हाण, तालुका रुग्णालयाचे समुपदेशक उमेश पेडणेकर हे  उपस्थित होते. या शिबीरात रक्तामधील साखर, लोह, कोलेस्ट्रॉल, थॉयरॉईड, लिवर, कीडनी, रक्तदाब तसेच रॅन्डम साखर तपासणी करण्यात आली. शिबीर यशस्वी होण्यासाठी बचत गटातील निशा कांबळी, जागृती गोन्साल्वीस, रेखा पवार, ज्योतिका परुळेकर, विजया माळगावकर, आरती कोडचवाडकर आणि बचतगटातील महिलांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा