You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये पदग्रहण सोहळा दिमाखात साजरा 

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये पदग्रहण सोहळा दिमाखात साजरा 

*स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये पदग्रहण सोहळा दिमाखात साजरा :*

सावंतवाडी

भविष्यातील सक्षम, जबाबदार आणि राष्ट्रनिष्ठ नेतृत्व घडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये आज दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आलेला विद्यार्थी परिषद शपथ विधी व पदग्रहण सोहळा अत्यंत दिमाखदार, प्रेरणादायी आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. नेतृत्व, संघभावना, जबाबदारीची जाणीव आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांचा संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. श्री. श्रीधर पाटील तहसीलदार, सावंतवाडी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रार्थनेने झाली. दीपप्रज्वलन प्रमुख पाहुणे मा. श्री. श्रीधर पाटील तहसीलदार, सावंतवाडी, शाळेचे संचालक मा. अॅड. रुजुल पाटणकर सर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. निधी सावंत व शाळेच्या समन्वयक सौ. सुषमा पालव यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. निधी सावंत यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देत त्यांचे स्वागत व सत्कार केला. शाळेच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेची माहिती देताना विद्यार्थ्यांनी नामांकन, छाननी, प्रचार, मतदान व मतमोजणी अशा लोकशाही पद्धतीने आपल्या प्रतिनिधींची निवड केल्याचे सांगण्यात आले.
नवनिर्वाचित हेड बॉय, हेड गर्ल, हाऊस कॅप्टन व व्हाइस कॅप्टन यांना मान्यवरांच्या हस्ते बॅज व सॅश प्रदान करण्यात आले. तसेच हाऊसचे ध्वज व बॅनर विद्यार्थ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित विद्यार्थी परिषद सदस्यांनी कर्तव्य, प्रामाणिकपणा, शिस्त आणि शाळेच्या मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेतली. यामध्ये हेड बॉय कु. शौर्य चव्हाण, हेड गर्ल कु. श्री कोरगावकर, अग्नी हाऊसची कॅप्टन कु. निधी शिर्के, वाईस कॅप्टन कु. योगांक करिवडेकर, पृथ्वी हाऊसचा कॅप्टन कु. नील सावंत, वाईस कॅप्टन कु. कवीश पेडणेकर, वायू हाऊसचा कॅप्टन कु. पृथ्वीराज गवस, वाईस कॅप्टन कु. गायत्री तानावडे, जल हाऊसचा कॅप्टन कु. रेहान सारंग, वाईस कॅप्टन कु. अनिका सुकी हे असून स्पोर्ट्स विभाग विद्यार्थी प्रमुख कु. यज्ञेश पवार, कलचरल विभाग विद्यार्थी प्रमुख कु. तनिष्क पवार, असेम्ब्ली विभाग विद्यार्थी प्रमुख कु. गौरीश परब, डीसीप्लिन विभाग विद्यार्थी प्रमुख कु. अस्मि प्रभू तेंडोलकर, एन्वोरर्नमेंट विभाग विद्यार्थी प्रमुख कु. सई नाईक, हेल्थ अँड हायजिन विभाग विद्यार्थी प्रमुख कु. प्रत्युशा घोगले, क्लिनलीनेस विद्यार्थी प्रमुख कु. हिना सारंग, फायनान्स विभाग विद्यार्थी प्रमुख कु. विहान राणे, एनर्जी कॉन्सर्वेशन विभाग विद्यार्थी प्रमुख कु. देवांग सारंग, गार्डनिंग विभाग विद्यार्थी प्रमुख कु.विहान बिरमोले यांचा समावेश होता. तर विद्यार्थ्यांमध्ये प्रीफेक्ट म्हणून कु. सायना अळवणी, कु. हेरंब नाटेकर, कु. सक्षम ओटावणेकर, कु. आराध्य शेटवे, कु. ऋतुजा पेडणेकर, कु. ध्यानी बथानी, कु. सौजन्या काजरेकर, कु. निलया शिंदे, कु. लिशा सामंत, कु. नुवैरा सय्यद यांचा सहभाग होता.
विविध हाऊस विभागाचे तसेच हेड बॉय, हेड गर्लसहित वरील सर्वच नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी आत्मविश्वासाने पदभार स्वीकारत विद्यालयाच्या प्रगतीसाठी सर्वोत्तम योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. या नव्या विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, आत्मविश्वास, सहकार्य आणि जबाबदारीची भावना विकसित होण्यास निश्चितच मदत होईल. या संस्मरणीय सोहळ्याने “नेतृत्वातून सेवा आणि सेवेतून उत्कृष्टता” हा संदेश दिला.
कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे मा. श्री. श्रीधर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या पदग्रहण सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक जागृती झाली असे मत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमा बरोबरच इतर ऍक्टिव्हिटी मध्ये देखील सहभाग घेतला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तर शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये नेतृत्व गुणाचा अवलंब करावा, गावातील अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी तत्पर राहावे असे सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रशालेच्या सहा. शिक्षिका सौ. अमृता मॅडम यांनी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सहा. शिक्षिका सौ. ग्रीष्मा सावंत यांनी केले. तर कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या समन्वयक सौ. सुषमा पालव यांनी केले. शाळेचे संचालक श्री रुजू पाटणकर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. निधी सावंत सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे नेतृत्व, शिस्त, जबाबदारी आणि राष्ट्र सेवेची प्रेरणा देणारा हा शपथविधी सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा