You are currently viewing सावंतवाडीत फिटनेस योग फाऊंडेशनतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा

सावंतवाडीत फिटनेस योग फाऊंडेशनतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा

सावंतवाडीत फिटनेस योग फाऊंडेशनतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा

योग शिक्षक प्रशिक्षण शिबिरात सामूहिक योग, प्राणायाम व ध्यानधारणा; गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद

सावंतवाडी :

फिटनेस योग फाऊंडेशन महाराष्ट्र अंतर्गत आयोजित योग शिक्षक प्रशिक्षण शिबिरामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव आज अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सावंतवाडी येथील जिमखाना हॉलमध्ये बुधवारी पहाटे ५.३० वाजता या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात महर्षी व्यासमुनी, महर्षी पतंजली, आदि योगी भगवान शिव आणि परमपूज्य स्वामी रामदेव बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि सामूहिक प्रार्थनेने झाली. यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींनी आपल्या गुरूंच्या चरणी पुष्प अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व, योगातील गुरूंचे अनन्यसाधारण स्थान आणि मानवी जीवनातील गुरूंची भूमिका याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित सामूहिक योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा सत्रात अनेक योगसाधकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच सहभागी साधकांनी योगामुळे जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांचे अनुभव आणि मनोगतेही व्यक्त केली.
या कार्यक्रमाला योग शिक्षक शेखर बांदेकर, फिटनेस युवा अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष नारायण सावंत, फिटनेस किड्स अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष विशाल लातये, फिटनेस महिला अकॅडमीच्या जिल्हाध्यक्षा सौ. रसिका सावंत, सावंतवाडीच्या नगरसेविका सौ. सीमा नाईक तसेच हिरकणी वस्तीस्तर संघाच्या अध्यक्षा सौ. प्रगती बामणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय योग शिक्षक प्रशिक्षणार्थी, योगसाधक आणि परिसरातील विविध गावांतील योगप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फिटनेस योग फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा