You are currently viewing पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

सिंधुदुर्गातील ३ हजार ६७४ शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यांतील यादी प्रसिद्ध

पात्र शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणिकरण करून घ्यावे

सिंधुदुर्ग 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ या योजनेची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था, राष्ट्रीयकृत व ग्रामिण बँकांची आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिध्द झाली आहे. जिल्ह्यातील ४२० गावांमधील विकास संस्था व जिल्हा बँकेकडील २७५७, राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकेकडील ९१७ अशा एकुण ३ हजार ६७४ शेतकऱ्यांची यादी गावनिहाय प्रसिध्द झालेली आहे. सदर पात्र शेतकऱ्यांची यादी ही संबंधीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखा, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय व तालुका सहाय्यक निबंधक सहकारी अधिकारी श्रेणी ०१ सहकारी संस्था कार्यालयात उपलब्ध आहेत. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी क्रमांक अनिवार्य असून ज्या शेतकऱ्यांचे अॅग्रीस्टॅक नोंदणी नसेल त्यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकार केंद्र/सीएससी केंद्रावर जाऊन अॅग्रीस्टॅक नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा उपनिबंधक प्रदिप मालगावे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

या योजनेतर्गत कर्जमुक्तीचा लाभ मिळणेसाठी यादीमधील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्र/महा ई सेवा केंद्र येथे जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घेणे गरजेचे आहे. आधार प्रमाणीकरणासाठी आधार कार्ड, अॅग्रीस्टॅक फामर आयडी व कर्ज खात्याचे व बचत खात्याचे पासबुक सोबत घेवुन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पुर्ण करुन घ्यावी. आधार प्रमाणीकरणाची संपूर्ण प्रकिया ही जिल्ह्यामधील आपले सरकार केंद्र, महा ई सेवा केंद्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत व विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थामध्ये करण्यात आली आहे. आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया ही विनामुल्य असून कोणत्याही केंद्रावर पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरणासाठी कोणतीही रक्कम आदा करु नये. तरी सर्व पात्र शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणिकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रदीप मालगावे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

तालुका निहाय गाव व पात्र शेतकरी संख्या

अ.क्र. तालुका गाव संख्या विकास व जिमस बॅंक राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँका
01 कणकवली 57 752 77
02 कुडाळ 75 184 159
03 देवगड 71 522 286
04 दोडामार्ग 32 42 101
05 मालवण 59 327 67
06 वेंगुर्ला 23 139 20
07 वैभववाडी 35 398 27
08 सावंतवाडी 68 393 180
एकूण – 420 2757 917

प्रतिक्रिया व्यक्त करा