ओजस मेस्त्री ९६.२० % मिळवून प्रथम
सावंतवाडी : येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता दहावीचा निकाल १०० % लागला असून तालुक्यामध्ये उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखलेली आहे. राणी पार्वतीदेवी हायस्कूलमधून विशेष नैपुण्य ५८ विद्यार्थी, प्रथम श्रेणी ४६ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी १५ विद्यार्थी व उत्तीर्ण श्रेणी ६ विद्यार्थी असे एकूण १२५ विद्यार्थीपैकी १२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेतून कु. मेस्त्री ओजस गोकुळदास हा ९६.२० % (४८१ गुण) मिळवून प्रथम, कु. चव्हाण प्रिया बन्सीधर व कु. सावंत समिक्षा विष्णू ९३.२० % (४६६ गुण) मिळवून संयुक्तपणे द्वितीय तर कु. गावडे काजल सुभाष , कु. कुडतरकर यश प्रविण , कु. कुडव अभिजीत उत्तम यांनी (४६५ गुण – ९३.००%) मिळवून संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकाविला. याचबरोबर, कु. देसाई वेदांत दिलीप ९२.२०%, कु. शंभरकर गौरव विजय ९२.२०%, कु. विचारे सृष्टी शशांक ९१.८०%, कु. गावडे युवराज विजय ९०.८०%, कु. घाडी जान्हवी संतोष ९०.००% असे घवघवीत यश मिळवले आहे. शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री.विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष श्री. अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच प्र.मुख्याध्यापक श्रीम. संप्रवी कशाळीकर, उपमुख्याध्यापक श्री. एस. एन पाटील, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, तसेच पालक, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालक- शिक्षकसंघ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून शुभेच्छा दिल्या आहेत.