आंबोली येथे पतसंस्था फेडरेशनचा मेळावा संपन्न
स्नेह नागरी सहकारी पत संस्थेचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
आंबोली
आंबोली येथील सैनिक स्कूलमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दोन दिवसीय प्रशिक्षण व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात यशस्वी सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पतसंस्थांचा गौरव करण्यात आला.
यावेळी राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते स्नेह नागरी सहकारी पत संस्था, सावंतवाडी यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ , अॅड. दीपक पटवर्धन , डी.डी.आर. श्री शिंदे, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष श्री कवितकर, फेडरेशनचे उपाध्यक्ष जॉय Dontaas तसेच समीर वंजारी उपस्थित होते.
स्नेह नागरी सहकारी पत संस्थेच्या वतीने अध्यक्ष श्री अनंत उचगावकर, मुख्याधिकारी सौ. संगीता प्रभू, सौ. कोमल सावंत (कणकवली सहाय्यक शाखा अधिकारी), सौ. सुप्रिया गोवेकर तसेच कुडाळ शाखेच्या सौ. नेहा साळवी यांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.
या गौरवामुळे संस्थेच्या कार्याचा सहकार क्षेत्रात विशेष सन्मान करण्यात आला असून उपस्थितांनी संस्थेचे अभिनंदन केले.
