You are currently viewing नानेली येथे वन संरक्षण हेतूने बीजरोपणचे सकारात्मक पाऊल

नानेली येथे वन संरक्षण हेतूने बीजरोपणचे सकारात्मक पाऊल

सावंतवाडी :

मा.उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री.नारनवर यांच्या संकल्पनेतून व मा.वनक्षेत्रपाल कुडाळ श्री.अमृत शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव वन परिमंडळातील नाणेली वनक्षेत्रामध्ये स्वंस्फुर्तीने व लोकसहभागातून वनक्षेत्रामध्ये वन्यप्राणी यांना भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खाद्य स्वरूपात फळे उपलब्ध व्हावे त्या दृष्टिकोनातून वनक्षेत्रामध्ये आंबा, फणस, कोकम आदी फळ झाडांचे  बीजरोपण सरपंच नाणेली मा.धुरी, पोलीस पाटील नाणेली व नाणेली ग्रामस्थ तसेच वनविभागाचे मा.वनपरिमंडळ अधिकारी माणगांव श्री.सुनिल सावंत, माणगांव बीट वनाधिकारी श्री.बाळराजे जगताप, केलेली बीट वनाधिकारी श्री. सुनील भंडारे व वाडोस बीट वनाधिकारी सौ. सारिका बाटे यांच्या उपस्थितीत बीज रोपण करण्यात आले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − eight =