You are currently viewing वेंगुर्लेत मत्स्य पाककला प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

वेंगुर्लेत मत्स्य पाककला प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सिंधू आत्मनिर्भर अभियानांतर्गत आयोजन; गोड्या पाण्यातील माशांबद्दल दिली माहिती..

वेंगुर्ले

सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य मोहस्तवाच्या निमित्ताने गोड्या पाण्यातील माशांचे प्रदर्शन व विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची ओळख व्हावी, यासाठी येथील भाजपा महिला मोर्चाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधु आत्मनिर्भर अभियानांतर्गत निलक्रांती संस्थेच्या माध्यमातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान हा कार्यक्रम येथील साई मंगल कार्यालयात पार पडला.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अभियानाचे प्रमुख अतुल काळसेकर, प्रदेश कार्या.का.सदस्य शरदजी चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मस्त्य महाविद्यालयाचे डाॅ. आशिष मोहीते, डाॅ. डबीर पठाण, डाॅ. एस्. टी.सारंगधर, महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले, आत्मनिर्भर योजना महिला मोर्चा कोकण प्रतिनिधी रक्ष्मी लुडबे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर, शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, महिला सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर, नगरसेविका श्रेया मयेकर, नगरसेविका साक्षी पेडणेकर, अल्पसंख्याक सेलच्या हसीना बेन मकानदार, उमा म्हारदळकर, कोकण विकास आघाडीच्या प्राची राणे, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर, शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण उपस्थित होते .
यावेळी उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना अतुल काळसेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर पॅकेज चा फायदा घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनवण्यासाठी भाजपा महिला मोर्चा च्या वतीने मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा जास्तीत जास्त महीलांनी फायदा घ्यावा. दरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा