यंदाचा अनोखा ऑस्कर सोहळा…ना सूत्रसंचालन, ना प्रेक्षक

यंदाचा अनोखा ऑस्कर सोहळा…ना सूत्रसंचालन, ना प्रेक्षक

Oscars 2021 कलाविश्वात अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली असून, एकामागून एक कलाकाविष्कारांचा गौरव या सोहळ्यात झाल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे पार पडलेल्या या 93व्या ऑस्कर सोहळ्यात विविध विभागातील पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदाचा पुरस्कार सोहळा यासाठी खास आहे, कारण त्याचं सूत्रसंचालन कोणाच्याही हाती नव्हतं, ना कोणी प्रेक्षकही या सोहळ्यासाठी उपस्थित नव्हते.

ऑस्कर सोहळ्यामध्ये दरवर्षी जे कलाकार हे जग सोडून निघून गेले त्यांना आदरांजली वाहिली जाते. हे वर्षंही त्याला अपवाद नव्हतं. यावेळी इरफान खान आणि जगविख्यात वेषभूषाकार भानू अथय्या यांना आदरांजली वाहण्यात आली.

या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट ठरलेले काही चित्रपट असे, सर्वोत्कृष्ट चित्रपट नोमॅडलॅंड. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – शॅलो झॅओ, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – फ्रान्सिस मॅकडरमंड ( नोमॅडलॅंड), सर्वोत्कृष्ट अभिनेता – एंथनी हॉपकिन्स (द फादर), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – डॅनिअल कलुआ (ज्युडस एंड द ब्लॅक मसाया) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री -यो जंग यौन (मिनारी), सर्वोत्कृष्ट एनिमेटेड फिल्म – साऊल, सर्वोत्कृष्ट फॉरेन लॅंग्वेज फिल्म – अनादर राऊंड (डेन्मार्क)

प्रतिक्रिया व्यक्त करा