You are currently viewing जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत जि. प. शाळा पाटथरची दमदार कामगिरी; सहा विद्यार्थ्यांनी पटकावली पदके

जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत जि. प. शाळा पाटथरची दमदार कामगिरी; सहा विद्यार्थ्यांनी पटकावली पदके

जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत जि. प. शाळा पाटथरची दमदार कामगिरी; सहा विद्यार्थ्यांनी पटकावली पदके

देवगड तालुक्याच्या शाळेचा जिल्हास्तरावर झेंडा; मुख्याध्यापिका स्वाती झुरे यांच्या मार्गदर्शनाखाली घवघवीत यश

देवगड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल, ओरोस येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत जि. प. प्राथमिक शाळा पाटथर (ता. देवगड) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या क्रीडा परंपरेत आणखी एका मानाच्या कामगिरीची नोंद केली.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात २५ किलो वजनगटात कल्पित कविश्वर साईम, ३० किलो वजनगटात सार्थक मारुती परब आणि ४० किलो वजनगटात मुलराज अमित परब यांनी तृतीय क्रमांक पटकावत पदकांची कमाई केली.
तर १४ वर्षांखालील मुलींच्या गटात २७ किलो वजनगटात आर्या विठोबा परब, ३२ किलो वजनगटात मृणाली अजीत कदम आणि ४० किलो वजनगटात श्रावणी श्रीराम परब यांनी तृतीय क्रमांक मिळवून शाळेच्या यशात मोलाची भर घातली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्वाती झुरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रेरणेमुळे विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा नावलौकिक उंचावला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कुणकेश्वर केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती देवकी शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश कदम, उपाध्यक्ष सौ. स्नेहा कदम, शिक्षक जांभवडेकर सर, दराडे सर तसेच पालकांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. या उल्लेखनीय यशामुळे पाटथर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशस्वी वाटचालीत आणखी एका मानाच्या पर्वाची भर पडली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा