विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी नवी मुंबई काँग्रेसचे आज नेरूळ येथे आंदोलन
शिक्षण, परीक्षा व भरती प्रक्रियेतील त्रुटींविरोधात शासनाचे लक्ष वेधणार; विद्यार्थ्यांवरील दडपशाहीचा निषेध
नवी मुंबई
राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण, परीक्षा व्यवस्था आणि भरती प्रक्रियेशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज (२४ जुलै) सायंकाळी ५.३० वाजता नेरूळ स्टेशनसमोरील सेक्टर १५, नेरूळ (पूर्व) येथे शांततापूर्ण, संविधानिक आणि लोकशाही मार्गाने निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत.
या आंदोलनाद्वारे विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाहीचा निषेध नोंदविण्यात येणार असून, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे.
या निदर्शनाला विद्यार्थी, युवक, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच या आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, अशी विनंती नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री. रामचंद्र (आबा) धर्माजी दळवी यांनी केली आहे.
