सावंतवाडी – कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी नूतन कार्यकारिणीची बैठक सावंतवाडी विश्रामगृह येथे संपन्न झाली. यावेळी कार्यकारिणीचा विस्तार करताना तालुकाध्यक्ष दीपक पटेकर यांनी सल्लागार समिती व निमंत्रित सदस्यांची कार्यक्रम समिती जाहीर केली. तसेच लवकरच ”साहित्य मिरगोत्सव” हा अभिनव उपक्रम राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सावंतवाडी येथील शासकीय विश्रामगृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुकाध्यक्ष दीपक पटेकर, सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, जिल्हा सदस्य संतोष सावंत, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, ॲड. नकुल पार्सेकर, सहसचिव विनायक गांवस, सदस्य सौ.मंगल नाईक-जोशी, प्रज्ञा मातोंडकर आदी उपस्थित होते. यावेळी सल्लागार समितीमध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जी.ए.बुवा, ॲड. अरुण पणदूरकर, सौ. उषा परब, प्रा. गणपत शिरोडकर, प्रा. सुभाष गोवेकर यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यक्रम समितीमध्ये सुश्मिता चव्हाण, ऋतुजा सावंत भोसले, रामदास पारकर, प्रा. रूपेश पाटील, अभय नेवगी, दिनानाथ नाईक यांची नियुक्ती करण्यात आल्याचे तालुकाध्यक्ष श्री.पटेकर यांनी जाहीर केले.