You are currently viewing वनीकरण विभागातील कार्य म्हणजे वन्यजीवांची सेवा करण्याची संधी – वनक्षेत्रपाल बेलवलकर

वनीकरण विभागातील कार्य म्हणजे वन्यजीवांची सेवा करण्याची संधी – वनक्षेत्रपाल बेलवलकर

निसर्गावर अतिक्रमण करून नव्हे तर अनुकूलन साधून जगा व जगू द्या- वनरक्षक अतुल खोत

तळेरे हायस्कूलमध्ये ‘वन्यजीव संरक्षण सप्ताह’ संपन्न

वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य, आणि विज्ञान महाविद्यालय तरळे येथे डॉ. एम.डी.देसाई सांस्कृतिक भवनात प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालय कणकवली, सामाजिक वनीकरण विभाग कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वन्यजीव संरक्षण सप्ताह’ नुकताच पार पडला. तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई व विद्यालयाच्या वतीने प्रभारी मुख्याध्यापक सी.व्ही. काटे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .
यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल बेलवलकर साहेब , प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालय कणकवलीचे वनपाल अमित जाधव साहेब , इंदूलकर साहेब ,कासार्डे वनरक्षक एम.पी. शेगावे, फोंडा वनरक्षक अतुल खोत , घोणसरी वनरक्षक अतुल पाटील , सर्प इंडियाचे पाटील , राजेश भोगले , मंदार राणे , शिक्षिका डी.सी. तळेकर , प्रा.ए.बी. कानकेकर , एन.बी.तडवी , पी.एन.काणेकर , पी.एम.पाटील , व्ही.डी.टाकळे , ए.पी.कोकरे , एन.पी.गावठे , ए. बी. तांबे , एस.यु. सुर्वे , एस.बी.जाधव , कनिष्ठ लिपिक के.डी.तळेकर , देवेंद्र तळेकर , संदेश तळेकर ,विद्यार्थी आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमप्रसंगी वनक्षेत्रपाल बेलवलकर साहेब म्हणाले , सामाजिक वनीकरण विभागातील कार्य म्हणजे वन्यजीवांची सेवा करण्याची उत्तम संधी या शब्दात आपल्या कार्याबद्दलची त्यांनी श्रद्धा व्यक्त केली . आपल्या या भूमिकेबद्दल विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. निसर्गावर अतिक्रमण करून नव्हे तर अनुकूलन साधून जगा व जगू द्या असे वनरक्षक अतुल खोत म्हणाले. या संदेशाचे महत्त्व देखील त्यांनी विद्यार्थ्यांनसमोर विशद केले.


यानंतर सर्प इंडियाचे प्रतिनिधी राजेश भोगले यांनी पोस्टर व प्रोजेक्टर च्या सहाय्याने सरीसृप वर्गातील प्राण्यांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली व सरपटणाऱ्या प्राण्यांविषयीची अनाठायी भीती कमी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले तसेच सर्पदंश झाल्यास घ्यावयाच्या प्राथमिक उपायांबाबत , काळजीबाबत मंदार राणे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक सी. व्ही. काटे यांनी केले तसेच विद्यार्थ्यांना वन्यजीवांबद्दल परिपूर्ण मार्गदर्शन केल्याबद्दल वनीकरण विभागाचे आभार मानले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशालेच्या प्राध्यापिका ए.बी. कानकेकर यांनी केले

मार्गदर्शन करताना वनरक्षक अतुल खोत सोबत इतर मान्यवर

प्रतिक्रिया व्यक्त करा