You are currently viewing ऐतिहासिक, भारतीय लष्कराच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच

ऐतिहासिक, भारतीय लष्कराच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच

भारतीय सेनेतील पाच महिला अधिकाऱ्यांना ‘कर्नल’ रँकेची पदोन्नती

भारतीय लष्कराच्या सिलेक्शन बोर्डानं 26 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांना कर्नल (टाइम स्केल) पदावर पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे. कॉर्प्स ऑफ सिग्नल, इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स (ईएमई) आणि कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्समध्ये सेवा देणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदी बढती देण्यात आली आहे. भारतीय लष्करातील वरील सेवामध्ये महिलांची कर्नलपदी बढती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कर्नल पदावर पदोन्नती केवळ आर्मी मेडिकल कॉर्प्स (एसएमसी), जज अॅडव्होकेट जनरल (जेएजी) आणि आर्मी एज्युकेशन कॉर्प्स (एईसी) च्या महिला अधिकाऱ्यांना लागू होती.

भारतीय लष्कराच्या विविध सेवांमध्ये महिला अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळणं हे महिला अधिकाऱ्यांसाठी करिअरच्या संधी वाढण्याचे लक्षण आहे. भारतीय लष्कराच्या बहुतांश शाखांमधून महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन देण्याच्या निर्णय यापूर्वी घेण्यात आला. हे भारतीय लष्करातील स्त्री पुरुष भेद कमी करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.

कर्नल टाइम स्केल रँकसाठी पाच महिला अधिकाऱ्यांची निवड झालीय. सिग्नल कॉर्प्समधून लेफ्टनंट कर्नल संगीता सरदाना, ईएमई कॉर्प्समधून लेफ्टनंट कर्नल सोनिया आनंद आणि लेफ्टनंट कर्नल नवनीत दुग्गल आणि इंजिनियर्स कॉर्प्समधून लेफ्टनंट कर्नल रीनू खन्ना आणि लेफ्टनंट कर्नल रिचा सागर यांची निवड झाली आहे.

सध्याची भारतरीय लष्कराची पिरॅमिड रचना आणि कडक निवड निकषांमुळे अनेक अधिकारी कर्नल पदापर्यंत पोहोचत नाहीत. जोपर्यंत सेवेत असलेले कर्नल निवृत्त होत नाही किंवा ब्रिगेडियरला बढती मिळत नाही. 26 वर्षांच्या सेवेनंतर ते कर्नल बनू शकतात म्हणून त्यांना कर्नल (टाईम स्केल ) म्हणून त्यांचा दर्जा लिहितो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =