You are currently viewing डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या मातोश्री सुभद्रा ऐवळे यांचे दुःखद निधन

डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या मातोश्री सुभद्रा ऐवळे यांचे दुःखद निधन

डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या मातोश्री सुभद्रा ऐवळे यांचे दुःखद निधन

वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास; सांगोला येथे अंत्यसंस्कार, सर्वत्र हळहळ

सावंतवाडी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या मातोश्री सुभद्रा अर्जुन ऐवळे यांचे अल्पशा आजाराने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दुःखद निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ८६ वर्षे होते.
त्यांच्या पार्थिवावर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुभद्रा ऐवळे यांच्या निधनाने ऐवळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा