You are currently viewing कोरोनाने कुडाळची वाट लावू देणार नाही!!

कोरोनाने कुडाळची वाट लावू देणार नाही!!

कुडाळ भाजपाचा एसटी डेपो व्यवस्थापकांना घेराव घालत इशारा

दुपारी ३ वाजता पुन्हा होणार एसटी जिल्हा नियंत्रक श्री रसाळ यांच्यासोबत भाजपाची चर्चा

कुडाळ एसटी डेपोतुन मुंबई येथे बेस्टच्या सेवेसाठी पाठवण्यात आलेले तब्बल २० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याच्या घटनेचे संतप्त पडसाद आज कुडाळमध्ये उमटले. कुडाळ पंचायत समिती सभापती सौ नूतन आईर, नगराध्यक्ष श्री ओंकार तेली हे कुडाळ कोरोनामुक्त होण्यासाठी जीव तोडून उपाययोजना करत आहेत, पण एसटी व्यवस्थापनाच्या बेजबाबदार कारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवाला तर धोका आहेच, परंतु तालुक्यात गावागावात एसटीच्या माध्यमातून कोरोना पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेतनाच्या नावाने तर बोंबच आहे, कर्मचाऱ्यांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेत त्यांना वेठीस धरत हवे तसे राबवण्याचे एसटीचे क्रूर धोरण आहे. केवळ वरिष्ठांच्या हुजरेगिरीपोटी स्थानिक फेऱ्यांचे वेळापत्रक बिघडवले जात आहे, तसेच एसटीचे कर्मचारी, चालक-वाहक यांच्यासोबत सर्वसामान्य जनतेच्या जीवीताशी खेळले जात आहे. याच्या विरोधात आज कुडाळ भाजपाने आक्रमक होत एसटी डेपो मॅनेजरवर संतप्त सवाल करत घेराव घातला. अखेर डेपो व्यवस्थापकाने आगार नियंत्रकांशी दूरध्वनीवर बोलणे करून दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांनाही चांगलेच धारेवर धरले. अखेर जिल्हा नियंत्रकांनी चर्चेसाठी तातडीने कुडाळला उपस्थित रहावे यावर पहिल्या सत्रातील आंदोलनाचा समारोप झाला. दुपारी तीन वाजता जिल्हा नियंत्रक कुडाळला आल्यानंतर हा विषयाला पुन्हा तोंड पुतण्याची शक्यता आहे.

या घेराव आंदोलनात कुडाळ भाजपाचे तालुकाध्यक्ष  विनायक राणे, जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष सौ संध्या तेरसे, ओबीसी मोर्चा महिला अध्यक्ष दिपलक्ष्मी पडते, पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, सोशल मीडिया जिल्हा संयोजक अविनाश पराडकर, जेष्ठ नेते राजू राऊळ, आरती पाटील, विजय कांबळी, राजू बक्षी, बंड्या सावंत, पप्या तवटे, राकेश कांदे, चेतन धुरी, राजवीर पाटील, अजय आकेरकर, नगरसेवक सुनील बांदेकर, नगरसेवक आबा धडाम, नगरसेविका अश्विनी गावडे, अविनाश पाटील, प्रसना गंगावणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 1 =