You are currently viewing जॉन पिंटो स्मृती पुरस्कार जेरोन फर्नांडिस व रुजाय फर्नांडिस यांना प्रदान

जॉन पिंटो स्मृती पुरस्कार जेरोन फर्नांडिस व रुजाय फर्नांडिस यांना प्रदान

मालवण

सिंधुदुर्ग जिल्हा खिश्चन विकास मंडळ, मुंबई पुरस्कृत मानाचा जॉन पिंटो स्मृती पुरस्कार आज आचरा जामडुल येथे आचरा येथील जेरोन फर्नांडिस व चिंदर येथील रुजाय फर्नांडिस यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कारप्राप्त फर्नांडिस यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम देऊन त्यांना मान्यवारांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कार वितरण प्रसंगी ज्येष्ठ धर्मगुरु फादर मायकल जी. फादर फ्रान्सिस डिसोजा, साहित्यिक मालवणी कवी रोझारिओ पिंटो, फासकर लोबो, अध्यक्ष पासकोल लोबो, सरचिटणीस विल्यम फर्नांडिस, मालवण खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गांवकर , जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी, बाबाजी भिसळे, जयप्रकाश परुळेकर, सुरेश गांवकर, जे.एम.फर्नांडिस, नरेश तारकर आदि मान्यवर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =