You are currently viewing श्री समर्थ सद्गुरु राऊळ महाराज दत्तप्रसाद भक्त मंडळ आयोजित गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न

श्री समर्थ सद्गुरु राऊळ महाराज दत्तप्रसाद भक्त मंडळ आयोजित गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न

मुंबई / प्रतिनिधी :

मुलुंड पूर्व येथे श्री समर्थ सद्गुरु राऊळ महाराज दत्तप्रसाद भक्त मंडळ आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी डी /5 औदुंबर सोसायटी, म्हाडा कॉलनी, मुलुंड पूर्व, येथे संपन्न झाला.

प.पू.सदगुरू गुरुदास माऊली यांनी गुरुचरित्र अध्यायाचे पारायण करताना सुचित केले की, तुमच्यातील एक सद्गुरु भक्त असून जीवनात तुम्हाला भेद करण्याचे कारण नाही खरंतर जो संकटाला सामोरे जातो ,त्याने घाबरण्याचे कारण नसते. आज गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा आणि या निमित्ताने परमपूज्य राऊळ नाथ महाराज भक्तांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,आई ही मूळ गुरु असे म्हटले आहे .म्हणून आई-वडिलांची सेवा करा. आपल्या मनोकामना पूर्ण होतील. असे त्यांनी सांगितले.

सोहळ्याला उपस्थित सेवेकरी भक्त सांप्रदायातील शिष्यांना त्यांनी ज्ञानदानातून मार्गदर्शन केले. यानिमित्ताने आरती, नामस्मरण भजन, धार्मिक कार्यक्रमांसोबत प.पू राऊळ महाराज गुरुस्थानी पाद्यपूजा, करण्यात आली. प.पू.सदगुरु राऊळ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला.

गुरु-शिष्य परंपरेची संकल्पना घेऊन श्री समर्थ सद्गुरु राऊळ महाराज दत्तप्रसाद भक्त मंडळातील सेवेकरी हे श्री गुरुचरित्र पारायणात मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा