You are currently viewing सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे ०२ ऑगस्ट रोजी ‘विद्यार्थी गुणगौरव २०२६’ सोहळ्याचे आयोजन

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे ०२ ऑगस्ट रोजी ‘विद्यार्थी गुणगौरव २०२६’ सोहळ्याचे आयोजन

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्यावतीने इयत्ता दहावी, बारावी व पदवीधर गुणवंत विद्यार्थी, समाजाचे नवनिर्वाचित जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच यांचा सन्मान करण्यासाठी ‘गुणगौरव २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी सावंतवाडी तालुका भंडारी समाज मंडळाच्यावतीने सावंतवाडी तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा – कला आदी विभागात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तीचा “भंडारी समाजरत्न” पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे, तरी इच्छुकांनी आपले प्रस्ताव मंडळाकडे दिनांक २५ जुलै २०२६ पर्यंत जमा करावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

हा सोहळा रविवार दि.२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता काझीशहाबुद्दीन हॉल, एसटी स्टँड समोर, सावंतवाडी येथे होणार आहे.

यावेळी दहावीमध्ये ७०%, बारावीमध्ये ६०% तसेच पदवी (ग्रॅज्युएशन) परीक्षेत ६०% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय सरपंच, पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांचा देखील विशेष सत्कार होणार असल्याची माहिती मंडळाने दिली आहे.

या कार्यक्रमाला समाजबांधवांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंतांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचे अध्यक्ष दत्तप्रसाद अरविंदेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९४२२६३३३३९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा