You are currently viewing सावंतवाडी पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी स्वीकारला पदभार
Oplus_16908288

सावंतवाडी पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी स्वीकारला पदभार

सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झालेल्या राजेंद्र मगदूम यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी येथून बदली झालेले पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.

दरम्यान, डीवायएसपी राजेश भागवत हे रजेवर असल्याने पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकडे पुढील दोन दिवस डीवायएसपी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

पदभार हस्तांतरणावेळी उपस्थित मान्यवरांनी राजेंद्र मगदूम व अमोल चव्हाण यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयराम खंदरेकर, माधुरी मुळीक, प्रमोद पाटील, अमित राजळ तसेच मनोज राजूत यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा