You are currently viewing शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने..

शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने..

अमरावतीला राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा संस्कार शिबीर

अमरावती

स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी व मिशन आयएएस फाउंडेशन यांच्या वतीने शिवराज्यभिषेक दिनानिमित्त ६ जून ते १२ जून २०२२ या कालावधीमध्ये सात दिवसांचे निवासी स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे .हे शिबिर अमरावती विद्यापीठा जवळील ग्रीन सर्कल या संशोधन केंद्रात संपन्न होणार आहे. या शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी 98 90 96 70 03 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मिशन आयएएसच्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी वयोगट हा दहा ते पंचवीस ठेवण्यात आला असून या स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी अमरावतीचे प्रभारी विभागीय आयुक्त श्री निलेश सागर नागपूरच्या एल आय टी चे संचालक व माजी कुलगुरू प्रा.राजू मानकर ,उपायुक्त श्री संजय पवार ,उपायुक्त श्री अजय लहाने सुप्रसिद्ध सनदी अधिकारी व मुख्य वनसंरक्षक श्री रंगनाथ नाईकडे अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, सुप्रसिद्ध संशोधक प्राचार्य डॉ व्ही टी इंगोले माजी कुलगुरू डॉ. कमल सिंह,सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री गिरीश जोशी, श्री सुधाकर मुरादे उपजिल्हाधिकारी श्री आशिष बिजवल श्री विवेक घोडके उपजिल्हाधिकारी श्रीमती वर्षा भाकरे दिल्लीच्या मालुका आयएएस अकादमीचे सदस्य श्री प्रशांत भाग्यवंत व अंकित राणे. एम पी एस सी टॉपर श्री अभिषेक कासोदे .यावर्षी आयएएस झालेले अमरावती चे सुपुत्र श्री अनिकेत ज्ञानेश्वर हिरडे. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री रवींद्र भुयार. सुप्रसिद्ध संमोहन तज्ञ प्रा शिवाजी कुचे,श्रीमती नीता मुंदडा लातूरचे संजय मगर,प्रा. प्रवीण खांडवे प्रा.आशय रोकडे श्री किरण बनसोड,कॅप्टन अरविंद चांडक,प्रा. कल्याणी बारब्दे इत्यादी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. या शिबिरामध्ये प्रमुख्याने यु पी एस सी आयएएस, एमपीएससी व्यक्तिमत्व विकास व विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास याबाबत सकाळी आठ ते रात्री आठ असे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे .या शिबिरासाठी बाहेर गावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची माफक दरात भोजन व निवास व्यवस्था संयोजकांनी केली आहे.
शिवराज्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ह्या राष्ट्रीय निवासी स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे व सहसंचालक प्रा. प्रवीण खांडवे यांनी केली आहे.
==============
प्रकाशनार्थ
प्रा *. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस* अकादमी अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − nine =