You are currently viewing वनविभागाकडून दिशाभूल ; पकडलेली मादी बिबट्या फोंड्यातील नाही

वनविभागाकडून दिशाभूल ; पकडलेली मादी बिबट्या फोंड्यातील नाही

वनविभागाकडून दिशाभूल ; पकडलेली मादी बिबट्या फोंड्यातील नाही

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा दावा

कणकवली :

घोणसरी गावात काल 6 नोव्हेंबर रोजी फासकीत अडकून सापडलेली मादी बिबट ही फोंडाघाट मध्ये मानववस्तीत फिरणारी नसून वनविभाग दिशाभूल करत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे. पिळणकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, घोणसरी गावातील टेम्बवाडी परिसरात डुक्कराच्या शिकारीसाठी अज्ञाताने लावलेल्या फासकीत अंदाजे 4 वर्ष वयाची मादी बिबट सापडली होती. वनविभागाने तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या बिबट्याची सुखरूप सुटका करून त्यावर वैद्यकीय उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले याबद्दल वन अधिकाऱ्यांचे अभिनंदन आहे. मात्र पकडण्यात आलेली मादी बिबट ही फोंडाघाट येथील मानवी वस्तीत फिरणारी असल्याचा वनअधिकाऱ्यांनी केलेला दावा दिशाभूल करणारा आहे.कारण फोंडाघात हवेली नगर मध्ये ग्रामस्थांच्या अंगणापर्यंत फिरणाऱ्या मादी बिबटसोबत तिचे दोन बछडे सुद्धा आहेत. मात्र घोणसरी गावात पकडलेल्या मादी बिबट सोबत किंवा जवळच्या परिसरात तिचे दोन्ही बछडे आढळून आले नाहीत. वनविभागाने वन्य प्राण्यांपासून नागरिकांची सुरक्षा करण्याची आपली जबाबदारी झटकण्यासाठी पकडलेली मादी बिबट ही फोंडाघाट परिसरात फिरत असलेलीच बिबट असल्याचा बनाव केला आहे. या मादी बिबट पासून स्थानिक ग्रामस्थांच्या जीवाला आणि त्यांच्या पशुधन मालमत्तेला धोका आहे. वन अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी पाळून फोंडाघाट परिसरात खुलेआम फिरत असलेल्या मादी बिबट पकडून स्थानिकांना दिलासा द्यावा अशी मागणीही पिळणकर यानी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा