You are currently viewing उघाडे-कोळंबवाडी-बांदा एसटी बस फेरी पुन्हा चालू करावी

उघाडे-कोळंबवाडी-बांदा एसटी बस फेरी पुन्हा चालू करावी

कोलझर, कळणे ग्रामस्थांच्यावातीने सावंतवाडी आगार व्यवस्थापक यांच्याकडे मागणी

सावंतवाडी :

कोरोना कालावधीत बंद असलेली उघाडे-कोळंबवाडी ते बांदा एसटी. बस फेरी पुन्हा चालू करावी, अशी मागणी संजय देसाई यांनी कोलझर, कळणे ग्रामस्थांच्यावातीने सावंतवाडी आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात देसाई यांनी म्हटले की, सावंतवाडी एसटी महामंडळाची उपाडे-कोळवाडी ते बांदा एसटी. बस फेरी चालू होती. परंतु कोरोना काळात ती बंद करण्यात आली. तरी सदर एसटी. बस फेरी पुर्ववत चालू करून शाळेतील मुले, व्यापारी, जेष्ठ नागरीक व जनतेची सोय करावी व एसटी विना होणारी जनतेची गैरसोय दूर करावी. यापूर्वीही एकदा यासाठी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर खात्याकडून सदर बाबत पाहणी वगैरे करण्यात आली. पण या गोष्टीला आता सुमारे एक महिना होत आला तरी आपल्याकडून काहीच हालचाल झाली नाही. तरी येत्या आठ दिवसात एसटी बस चालू न केल्यास आठ दिवसानंतर २९ जुलै रोजी सावंतवाडी आगारा समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देसाई यांनी निवेदनातून दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =