बेस्ट उपक्रमासाठी करण्यात आलेल्या खर्चात एस टी प्रशासनाने केलाय मोठा भ्रष्टाचार…

बेस्ट उपक्रमासाठी करण्यात आलेल्या खर्चात एस टी प्रशासनाने केलाय मोठा भ्रष्टाचार…

महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना करणार एस टी प्रशासनाची पोल खोल

कुडाळ

बेस्ट उपक्रमासाठी पाठवण्यात आलेल्या एसटी कामगारांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आणि त्यासाठी होणारा खर्च यात मोठा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी केला आहे.

अखंड महाराष्ट्रातून कोविड काळात “बेस्टच्या” उपक्रमासाठी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या जेवण व रहाण्यासाठी केलेल्या करारामध्ये लाखों रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या पगारात दिवस काढावे लागत आहेत. प्रशासनाने कोरोना काळात या कामगारांना आधार देण्याची खूपच गरज होती परंतु गेंड्याची कातडी पांघरलेल्या उन्मत्त प्रशासनाला कामगारांच्या समस्या कधीच समजल्या नाहीत. एसटीचा कर्मचारी दिवसभर राबतो मात्र त्याला हवा तेवढा पगार मिळत नाही.
कोविड काळात बेस्ट च्या मदतीला एसटी प्रशासन धावत आहे आणि ते कर्तव्य आहे. मात्र यासाठी करण्यात आलेल्या करारात काही तरी काळे नक्कीच शिजत आहे. विचार केला असता एस टी प्रशासनाने कुठतरी भला मोठा खर्च या सेवेसाठी केला आहे असं दाखवल आहे. परंतु तो खर्च एसटी प्रशासनाने कशावर आणि कुणासाठी केला असा फार मोठा सवाल बनी नाडकर्णी यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे संबंधित बेस्ट उपक्रमासाठी करण्यात आलेल्या करारात फार मोठा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष हरी माळी यांच्या आदेशाने व विकास अख्लेकरांच्या मार्गदर्शनाखाली एसटी प्रशासनाच्या सर्व भोंगळ कारभारांची पोल खोल आपण करणार असल्याची माहिती मीडियाशी बोलताना जे.डी.उर्फ बनी नाडकर्णी यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा